अबब! फक्त पाच वर्षांत 10 लाख भारतीय झाले विदेशी; नागरिकत्व सोडण्याची कारणेही धक्कादायक

अबब! फक्त पाच वर्षांत 10 लाख भारतीय झाले विदेशी; नागरिकत्व सोडण्याची कारणेही धक्कादायक

Indian Citizenship : राज्यसभेत परराष्ट्र मंत्रालयाला एक प्रश्न विचारण्यात आला होता. यावर मंत्रालयाने दिलेले (Indian Citizenship) उत्तर नक्कीच काळजीत टाकणारे आहे. किती लोकांनी भारताची नागरिकता सोडली आहे असा प्रश्न मंत्रालयाला विचारण्यात आला होता. या प्रश्नाच्या उत्तरात मंत्रालयाने मागील पाच वर्षांची आकडेवारी सभागृहात सादर केली. या आकडेवारी नुसार सन 2019 ते 2024 या पाच वर्षांपैकी 2022 या एकाच वर्षात सर्वाधिक लोकांनी नागरिकता सोडली.
सन 2022 मध्ये 2 लाख 25 हजार 620 लोकांनी भारताची नागरिकता सोडली. हा आकडा मागच्या वर्षाच्या तुलनेत थोडा कमी आहे. राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनी ही माहिती दिली.

जगातील अनेक देशांमध्ये भारतीय नागरिक राहतात. कुणी रोजगाराच्या निमित्ताने तर कुणी रोजगाराच्या निमित्ताने तर कुणी विदेशात स्थायिक होण्याच्या निमित्ताने परदेश गाठला आहे. याच लोकांच्या बाबतीत माहिती मागवण्यात आली होती. खरंतर काही लोक परदेशातच त्यांचं सगळं आयुष्य व्यतित करतात. पण त्या देशाची नागरिकता घेत नाही. तर दुसरीकडे असेही लोक आहेत जे भारताची नागरिकता सोडून विदेशात स्थायिक होतात.

भारताचे नागरिकत्व सोडण्याचे प्रमाण सातत्याने वाढत चालली आहे याची माहिती आपल्याकडे आहे का असा प्रश्न परराष्ट्र मंत्रालयाला विचारण्यात आला होता. सन 2024 मध्ये 2 लाख 6 हजार 378 लोकांनी नागरिकत्व सोडले होते. 2023 आणि 2022 च्या तुलनेत हा आकडा थोडासा कमी आहे. पण 2021, 2020 आणि 2019 च्या तुलनेत हा आकडा थोडा जास्त आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गोड बातमी! वर्षातून एकदा मिळणार महिनाभर रजा

नागरिकत्व सोडण्याची प्रक्रिया काय

नागरिकत्व सोडण्याचा अर्ज स्वीकारण्या आधी संपूर्ण तपासणी सरकारकडून केली जाते का असाही प्रश्न विचारण्यात आला होता. यानंतर सरकारने नागरिकत्व सोडण्याची काय प्रक्रिया आहे याची माहिती दिली. नागरिकत्व सोडण्यासाठी सर्वात आधी https://www.indiancitizenahiponline.nic.in या वेबसाईटवर अर्ज करावा लागेल. यानंतर संबंधित अर्जदाराचा पासपोर्ट आणि अन्य कागदपत्रांचे व्हेरिफिकेशन केले जाते. यानंतर ही कागदपत्रे पुढील कार्यवाहीसाठी सरकारी विभागांकडे पाठवली जातात. यासाठी एक महिन्याची मुदत असते.

किती वेळ लागतो

कागदपत्रांचे व्हेरिफिकेशन केल्यानंतर 30 दिवसांनंतर Renunciation Certificate ऑनलाइन पद्धतीने मिळते. या प्रक्रियेत जवळपास दोन महिने लागू शकतात. भारतीय नागरिकत्व सोडल्यानंतर संबंधितांकडे असणारे मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन यांसारखी कागदपत्रे संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करावी लागतील. यानंतर प्रक्रिया पूर्ण होईल.

किती लोकांनी सोडले भारताचे नागरिकत्व

2024 : 2 लाख 6 हजार 378
2023 : 2 लाख 16 हजार 219
2022 : 2 लाख 25 हजार 620
2021 : 1 लाख 63 हजार 370
2020 : 85 हजार 256
2019 : 1 लाख 44 हजार 017

PM मोदींची ऐतिहासिक झेप! इंदिरा गांधींचा विक्रम पार केला, सर्वात जास्त काळ सत्तेवर…

follow us
  • fb
  • instagram
  • youtube