सेनेतील आमदारांकडूनच शिंदेंचा गेम? मंत्र्यांची लिस्ट अन् दिल्लीतला मास्टर प्लान, राऊतांनी सांगितला

Sanjay Raut Claims Eknath Shinde’s Game from Shivsena MLA : राज्याच्या सत्ताकारणात सध्या एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय. गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून (BJP) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना डावललं जाणार, त्यांचा राजकीय गेम होणार, अशी जोरदार चर्चा सुरू होती. पण आता या चर्चांना नवं वळण मिळालं आहे. कारण या वेळी थेट शिंदे गटातीलच काही आमदारांनीच एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभं करत, गेम केल्याचं समोर येतंय. सत्तेतील प्रमुख घटकपक्ष म्हणून काम करणाऱ्या शिंदे गटातील आमदारांचे प्रकरणं समोर येत आहेत. त्यांचे वक्तव्य अन् कृतीच शिंदेंच्या अडचणी वाढवत आहेत.
शिंदे पिता-पुत्र अडचणीत? दारू घोटाळ्यात निकटवर्तीय अटकेत, संजय राऊतांचा स्फोटक आरोप
या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत असल्याची कुजबुज सुरू आहे. शिंदे गटातली स्थिती भाजपसाठी सोयीची ठरण्याची शक्यता असून, त्यामुळेच ‘शिंदे यांचा गेम त्यांच्याच लोकांनी केला का? असा प्रश्न उपस्थित होतोय. सध्या तरी या प्रकरणावर शिंदे गटाकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली, तरी आगामी काही दिवसांत गटबाजी, नाराज आमदार, आणि भाजपची खेळी – हे सगळं मिळून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा स्फोट घडवून आणू शकतं, असं वक्तव्य खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलंय.
संजय राऊतांचा दावा
माध्यमांसोबत बोलताना राऊत यांनी म्हटलंय की, मंत्रिमंडळात कोणाला ठेवायचं अन् कोणाला काढायचं? हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. पण या सरकारचा रिमोट कंट्रोल दिल्लीत अमित शाह यांच्याकडे आहे. काल मुख्यमंत्री एका (Maharashtra Politics) कार्यक्रमासाठी दिल्लीला गेले होते. परंतु त्यांचा मुख्य हेतू, मंत्रिमंडळात गोंधळाचं वातावरण सुरू आहे. त्यांच्या नियंत्रणाबाहेर स्थिती गेलेली आहे. याचसंदर्भात मार्ग काढण्यासाठी काल ते दिल्लीला गेले.
अमेरिकेतील मराठी शाळांना महाराष्ट्र शासनाचं सहकार्य; अभ्यासक्रम पुरवण्याचं मंत्री शेलारांचं अश्वासन
मंत्रिमंडळातील चार मंत्री
या मंत्रिमंडळातील चार मंत्री जाणार आहेत. संजय शिरसाट, माणिकराव कोकाटे, योगेश कदम आणि बाकीची नावं समोर येत आहेत. संपूर्ण मंत्रिमंडळाची सफाई करून एक नवं मंत्रिमंडळ आणावं, अशी चर्चा दिल्लीत अन् मुख्यमंत्र्यांच्या वर्तुळात सुरू आहे. घोटाळे, लेडीज बार, शेतकऱ्यांच्या विरोधात वक्तव्य, पैशाच्या उघड्या बॅगा घेवून बसणे. हे ओझं आता फडणवीसांना पेलवत नाही, त्यांना फेकताही येत नाही. ज्यांच्याकडे संख्याबळ आहे, त्यांना असं वाकायची गरज नाही. ते त्यांचं काम करत आहे. झारखंडमधून एक पथक आलं अन् अमित साळुंखे नावाच्या व्यक्तीला अटक करून गेलं. 800 कोटींचा अॅम्बुलन्स घोटाळा. 108 नंबर अॅम्ब्युलन्स, साडेसहाशे कोटींनी टेंडर वाढवलं असा आरोप संजय राऊत यांनी केलं. साळुंखे श्रीकांत मेडिकल फाऊंडेशनचा आर्थिक कणा आहेत, असा देखील गौप्यस्फोट राऊतांनी केलंय. ही अटक सहज झालेली नाही. सरकारला या पैशाला कुठे पाय फुटलेत, हे शोधायचं आहे. हे धागेदोरे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापर्यंत येत आहेत.
शिंदेंच्या आमदारानीच शिंदेंचा गेम केला अशी स्क्रिप्ट केली. मागील काही दिवसांपासून भाजप एकनाथ शिंदे यांना डावलणार, त्यांचा गेम करणार अशी चर्चा सुरू होती. परंतु आता मात्र यामध्ये मोठं ट्विस्ट आलंय. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या आमदारांनी त्यांचा गेम केलाय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.