BJP Headquarters : भाजप मुख्यालयात सहा दिवस ड्युटीवर असणार राज्यमंत्री, नेमकं कारण काय?

BJP Headquarters : भाजप मुख्यालयात सहा दिवस ड्युटीवर असणार राज्यमंत्री, नेमकं कारण काय?

BJP Headquarters : मोदी सरकारचे राज्यमंत्री आता भाजप मुख्यालयात ड्युटीवर असणार असल्याची माहिती समोर आली आहे. पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन काम करण्याच्या उद्देशाने मोदी सरकारचे राज्यमंत्री भाजप मुख्यालयात ड्युटीवर (BJP Headquarters) असणार आहे. माहितीनुसार, राज्यमंत्री आठवड्यातील सहा दिवस सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत भाजप मुख्यालयात ड्युटीवर असणार आहे.

जबाबदारी काय असणार?

समोर आलेल्या माहितीनुसार, संघटना आणि सरकारमध्ये चांगले समन्वय साधण्याची आणि भाजप (BJP) कार्यकर्त्यांची बाजू ऐकण्याची जबाबदारी पार पाडणार आहे. तसेच हे राज्यमंत्री भाजप संघटना निवडणुकीत पक्षाच्या अधिकाऱ्यांच्या व्यस्ततेची भरपाई करतील आणि राज्यांचे प्रभारी असणार आहे.

कोण कधी ड्युटीवर असणार ?

आज म्हणजे 28 जून रोजी महिला आणि बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर (Savitri Thakur) संपूर्ण दिवस भाजप मुख्यालयात असणार आहे. तर 30 जून रोजी संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ भाजप मुख्यालयात असणार आहे. तर 1 जूलैरोजी रस्ते वाहतून राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा ड्युटीवर असणार आहे. तर 2 जुलै रोजी आदिवासी राज्यमंत्री दुर्गा दास उईके, 3 जुलै रोजी माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन आणि 4 जुलै रोजी सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर भाजप मुख्यालयात ड्युटीवर असणार आहे.

उद्देश काय आहे?

संघटना आणि सरकारमधील समन्वय अधिक मजबूत करण्यासाठी भाजपकडून नवीन उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या दरम्यान मंत्री पक्ष कार्यकर्त्यांना भेटतील आणि त्यांच्या समस्या ऐकतील आणि त्वरित उपाय शोधण्याचा प्रयत्न करतील.

Video : शेफालीचा मृत्यू ते धावाधाव, नेमकं काय घडलं?; वॉचमनने उलगडला संपूर्ण घटनाक्रम

या उपक्रमामुळे तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना थेट संवाद आणि मार्गदर्शन मिळेल. यामुळे सरकारच्या योजना आणि धोरणे समजून घेणे आणि तळागाळापर्यंत पोहोचवणे सोपे होईल, तर संघटना आणि सत्तेतही चांगले समन्वय निर्माण होईल. असा पक्ष नेतृत्वाचा विश्वास आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube