Video : शेफालीचा मृत्यू ते धावाधाव, नेमकं काय घडलं?; वॉचमनने उलगडला संपूर्ण घटनाक्रम

Video : शेफालीचा मृत्यू ते धावाधाव, नेमकं काय घडलं?; वॉचमनने उलगडला संपूर्ण घटनाक्रम

Shefali Jariwala Death :  बॉलीवूड अभिनेत्री शेफाली जरीवालाचा वयाच्या 42 व्या वर्षी निधन झाल्याने (Shefali Jariwala Death) बॉलीवूडमध्ये (Bollywood) शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर ‘काटा लगा गर्ल’ नावाने प्रसिद्ध असणारी शेफालीने अचानक जगाचा निरोप घेतल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने तिचा निधन झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सध्या शेफालीचा मृतदेह पोस्टमाॅर्टेमसाठी पाठवण्यात आला आहे.

तर दुसरीकडे शेफाली ज्या इमारतीमध्ये राहत होती त्याच्या चौकीदाराने पोलिसांना 27 जूनच्या रात्रीचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. तर मुंबई पोलीस काल रात्री उशिरा 1 वाजता शेफाली जरीवालाच्या घरी पोहोचले असून सध्या तिच्या घरी फॉरेन्सिक टीम घराचा तपास करत आहे. याच बरोबर पोलीस घरात असलेल्या इतर कुटुंबातील सदस्यांची चौकशी करत आहे.

वॉचमनने काय सांगितले ?

अभिनेत्री शेफाली जरीवाला पती पराग त्यागीसोबत अंधेरीतील गोल्डन रेज (Golden Rays) नावाच्या इमारतीत राहत होती. या इमारतीचा वॉचमन शत्रुधन महातो (Shatrughan Mahate) म्हणाला की, रात्री 10- 10. 15 च्या सुमारास एक गाडी गेटमधून निघाली होती. गेटवर गाडी येताच मी गेट उघडले. गाडी खूप वेगाने होती. असं वाटत होते की काही इमर्जन्सी आहे. गाडीला काळी काच होती त्यामुळे शेफाली मॅडम आत होती की नाही हे माहिती नाही. मी गुरुवारी शेफाली मॅडमला शेवटचे पाहिले होते. शेफाली मॅडम पतीसोबत फिरायला गेले होते आणि त्यांच्यासोबत त्यांचा कुत्रा देखील होता.

माध्यमांशी बोलताना वॉचमन शत्रुधन महाते पुढे म्हणाला की, शेफाली मॅडम एक चांगली व्यक्ती होती. रात्री 1 वाजता कोणीतरी आले आणि मला तिचा फोटो दाखवला आणि विचारले की मी तिला ओळखतो का? यांचा निधन झाले आहे. सुरुवातीला मला विश्वास बसला नाही. असं वॉचमन शत्रुधन महाते म्हणाला.

Shefali Jariwala Death : तरुण दिसण्यासाठी…; शेफालीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी नेमकं काय सांगितलं?

पोलिसांनी काय म्हटले?

तर दुसरीकडे या प्रकरणात मुंबई पोलिसांनी सांगितले की, अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या निधनाची माहिती मुंबई पोलिसांना रात्री 1 वाजता देण्यात आली. तिचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नाही. अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube