Hrithik Roshan vs Jr NTR in War 2 : ऋतिक रोशन (Hrithik Roshan) आणि एनटीआर (Jr NTR) यांच्यातील खेळकर स्पर्धेला आज एक नवं वळण मिळालं आहे. चाहत्यांना हे फारच आवडतं आहे. वॉर 2 या बहुप्रतिक्षित चित्रपटातील (War 2) आमना-सामना सुरूवातीला फक्त ऑनलाईन मस्करी होती, पण आता ती अक्षरशः रस्त्यावर आली (Entertainment News) आहे.
एक धाडसी आणि मजेशीर पाऊल उचलत, एनटीआर ने थेट ऋतिक रोशनच्या घराबाहेर एक भव्य जाहिरात फलक (बिलबोर्ड) लावला. ज्यावर लिहिले होते, ‘घुंगरू तुटतील पण आमच्याशी ही वॉर जिंकू शकणार (Bollywood News) नाहीस! #NTRvsHrithik’
मराठी सिनेमाच्या हक्कासाठी सरकार मैदानात! मल्टिप्लेक्समध्ये शो मिळवून देणार, समितीची स्थापना…
ऋतिकने या जाहिरात फलकाचा फोटो शेअर करत जबरदस्त उत्तर दिलं, ज्याने इंटरनेटवर धुमाकूळ घातला. त्यांनी लिहिलं: ठीक आहे @jrntr, आता तर तुम्ही खरंच अति केलं. माझ्या घरासमोर फलक लावून! ठीक आहे, आव्हान स्वीकारले. लक्षात ठेवा, हे सगळं तुमच्यामुळेच सुरू झालंय. #9DaysToWar2″
या पोस्ट ने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. वॉर 2च्या प्रेक्षकांमध्ये अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाला अवघे 9 दिवस उरले आहेत. चाहते आता या सामन्याला “2025 मधील सर्वात मोठी टक्कर” म्हणत आहेत. हे धमाकेदार आमनेसामनेचं दृश्य केवळ पडद्यावरच नव्हे, तर पडद्याबाहेरही पाहायला मिळणार आहे.
मला अभिनेते पंकज त्रिपाठी आवडतात; त्यांच्यासोबत…,मोदी सरकारला घेरणाऱ्या खासदार मोईत्रा चर्चेत
वॉर 2 या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी यांनी केले असून, निर्माता आदित्य चोप्रा आहेत. या चित्रपटात ऋतिक रोशन, एनटीआर आणि कियारा अडवाणी प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत. चित्रपट 14 ऑगस्टला हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.