मराठी सिनेमाच्या हक्कासाठी सरकार मैदानात! मल्टिप्लेक्समध्ये शो मिळवून देणार, समितीची स्थापना…

मराठी सिनेमाच्या हक्कासाठी सरकार मैदानात! मल्टिप्लेक्समध्ये शो मिळवून देणार, समितीची स्थापना…

Marathi Cinema Place In multiplexes : मराठी चित्रपटांना (Marathi Cinema)मल्टिप्लेक्समध्ये पुरेसे शो मिळत नसल्याने गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटसृष्टीतील निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांकडून सातत्याने नाराजी (multiplexes) व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने अखेर सकारात्मक भूमिका घेतली असून, मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्समध्ये अधिक स्थान मिळवून देण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती (Maharashtra Goverment) स्थापन केली आहे.

या समितीत गृह, नगरविकास, परिवहन, तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव, शासकीय अधिकारी, मल्टिप्लेक्सचे प्रतिनिधी, चित्रपट निर्माते, वितरक यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या संघटनांचे प्रमुख पदाधिकारी यांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीचा उद्देश म्हणजे मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांसाठी आवश्यक त्या धोरणात्मक सुधारणांचा अभ्यास करून ठोस शिफारसी करणे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक प्रकार; थार कारला बांधून एटीएमच नेलं ओढत, पण…

मराठी चित्रपटसृष्टीला बळकटी देणाऱ्या उपाययोजना

समिती दीड महिन्याच्या आत अभ्यास करून आपला अहवाल राज्य शासनाला सादर करणार आहे. या अहवालात मराठी सिनेमासाठी मल्टिप्लेक्समध्ये निश्चित वेळेचे आणि स्क्रीनचे बंधन, आर्थिक सवलती, अनुदान धोरण, तिकीट दर यासारख्या मुद्द्यांवर शिफारसी अपेक्षित आहेत.

अनेक अफेअर अन् डेंजर डेंजर ब्रेकअप्स…, अभिनेत्री प्राजक्ता माळीने सांगितले अनेक किस्से

मराठी चित्रपटांच्या वितरणात अडथळे

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने यासंदर्भातील प्रस्तावाला मान्यता दिली आहे. या पार्श्वभूमीवर लवकरच समितीच्या पहिल्या बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकीत मल्टिप्लेक्समधील विद्यमान धोरणांचा आढावा घेऊन मराठी चित्रपटांच्या वितरणात अडथळे निर्माण करणाऱ्या बाबींवर चर्चा होणार आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अनेक मराठी दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी सरकारकडे यासंदर्भात लेखी निवेदन दिले होते. त्यानंतर शासनाने तातडीने हालचाल करत समिती स्थापन केली आहे. ही समिती केवळ समस्येचा अभ्यासच करणार नाही, तर मराठी चित्रपटसृष्टीला बळकटी देणाऱ्या दीर्घकालीन उपाययोजनांची शिफारसही करणार आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube