Download App

Gadar Returns: ‘गदर: एक प्रेमकथा’ 22 वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Gadar Returns To Cinemas:  एक प्रेम कथा हा चित्रपट 22 वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन होत आहे. लक्षावधी लोकांची मने जिंकणारा हा सिनेमा आता जबरदस्त 4K व्हिज्युअल आणि इमर्सिव डॉल्बी अॅटमॉस साउंडसह संपूर्ण नवीन अवतारात अनुभवला जाणार आहे. ज्यामुळे प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव मिळेल. सनी देओल आणि अमिषा पटेल अभिनीत, ‘गदर’ हा भारताच्या फाळणीवर आधारित आहे.

‘गदर 2’ चित्रपट 9 जून 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. अशातच आता चित्रपटाच्या निर्मात्यांनी (Filmmaker) मोठा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता 22 वर्षांनंतर, निर्मात्यांनी ‘गदर: एक प्रेम कथा’ थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. सिनेमाच्या निर्मिती कंपनीने यासंदर्भात अधिकृत निवेदन जारी केले आहे. ‘गदर 2: द कथा कंटिन्यू’पूर्वी ‘गदर: एक प्रेम कथा’ रिलीज होणार असल्याचे निर्मात्यांनी सांगितलं आहे. विशेष म्हणजे तो २००१ मध्ये ज्या तारखेला रिलीज झाला होता, त्याच तारखेला पुन्हा रिलीज होणार असल्याची मोठी चर्चा होती.

निर्मात्यांनी ‘गदर 2’ च्या अगोदर ‘गदर: एक प्रेम कथा’ रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून प्रेक्षकांना संपूर्ण कथा पुन्हा एकदा पाहता येईल आणि समजून घेता येणार आहे. निर्मात्यांनी १५ जून २०२३ रोजी चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, ‘गदर २’ ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. यामुळे प्रेक्षकांना ‘गदर’ आणि ‘गदर २’ चित्रपट काही महिन्यांच्या अंतराने थिएटरमध्ये पाहता येणार आहेत.

‘Raavrambha’ पाहिल्यानंतर प्रसिद्ध मराठमोळ्या दिग्दर्शक महेश टिळेकरांची ‘ती’ पोस्ट चर्चेत

‘गदर २’चं शूटिंग पूर्ण झालं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केलं आहे. या चित्रपटात त्यांचा मुलगा उत्कर्ष शर्मा देखील दिसणार आहे, ‘गदर: एक प्रेम कथा’ मध्ये बालकलाकार असलेला उत्कर्ष ‘गदर २’मध्ये नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Tags

follow us