Download App

Bholaa चित्रपटाला विकेंडचा फायदा, दुसऱ्या दिवशी मंदावलेली कमाई तेजीत

बॉलिवूडचा सिंघम अशी ओळख असणाऱ्या अजय देवगण (Ajay Devgan) हा आयकॉनिक अभिनेत्यांपैकी एक आहे. अजय देवगण गेल्या कित्येक वर्षांपासून चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. अजयच्या अभिनयाला चाहत्यांची मोठी पसंती मिळते. मागील वर्षी रिलीज झालेल्या अजय देवगणचा दृष्यम-2 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. आता त्याचा भोला (Bholaa) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

‘भोला’ हा चित्रपट गुरूवारी (30 मार्च) रिलीज झाला आहे. भोला या चित्रपटाचं अनेक जण सोशल मीडियावर कौतुक करण्यात येत आहेत. पहिल्या दिवशी या चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली. भोला या चित्रपटानं रिलीज झाल्यावर पहिल्या दिवशी 11.50 कोटी एवढी तर दुसऱ्या दिवशी केवळ 7.40 कोटींची कमाई केली. त्यामुळे चित्रपटाच्या कमाईवर शंका घेतली जात असताना. आज रिलीजच्या पहिल्या शनिवारी चित्रपटाच्या कमाईने उचल खाल्ली आहे. त्यामुळे चित्रपटाला विकेंडचा फायदा झाला आहे.

या चित्रपटाची तीन दिवसांची कमाई 30.10 कोटी झाली आहे. अजयच्या दृष्यम-2 या चित्रपटाने पहिल्या दिवशी 15.38 कोटींची कमाई केली होती. यामुळे भोला या चित्रपटानं दृष्यम-2 या चित्रपटाचं ग्रँड ओपनिंग-रेकॉर्ड तोडू शकला नाही. पण वीकेंडला भोला चित्रपट मोठी कमाई करेल, असा अंदाज लावला जात आहे.

Bholaa Box Office Collection: ‘भोला’ची ग्रँड ओपनिंग! पहिल्याच दिवशी कमावले 11.50 कोटी

भोला चित्रपटात अजय देवगणसोबतच तब्बू, दीपक डोबरियाल, संजय मिश्रा, अमाला पॉल आणि गजराज राव यांनी मुख्य भूमिका साकारली. अजयचा भोला देशभरातील ४००० स्क्रिनवर प्रदर्शित झाला आहे. तामिळ सिनेमा ‘कैथी’चा रिमेक असणारा भोला अभिनेता अजय देवगणनेच दिग्दर्शित केला आहे. भारतात हा सिनेमा २०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला होता. तर आता भोला हा चित्रपट किती कमाई करणार? याकडे देवगण आणि तब्बूच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे. शाहरुखच्या ‘पठाण’नंतर आता बॉक्स ऑफिसवर अजय देवगणच्या ‘भोला’चा सर्वत्र गाजावाजा पाहायला मिळत आहे.

Tags

follow us