Download App

India vs Bangladesh: वर्ल्डकपमध्ये विराटचं पहिलं शतक; नवऱ्याचं तोंडभरून कौतुक करत अनुष्काची पोस्ट

India vs Bangladesh: सध्या सगळीकडेच वर्ल्डकपचा थरार पाहायला मिळत आहे. गुरुवारी पुण्यातील बालेवाडी स्टेडियमवर (Balewadi Stadium) भारत आणि बांगलादेशमध्ये थरारक सामना रंगला. यंदाच्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची विजयी घौडदौड कायम बघायला मिळाला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सलग चौथ्या विजय मिळवला आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावरील सामन्यात भारताने 7 गडी राखून भारतावर विजय मिळवला. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) 48 वा शतक झळकावलं. त्याच्या या कामगिरीनंतर त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माने (anushka sharma) एक पोस्ट शेअर केली.

anushka sharma

अनुष्का शर्मा ही सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. नुकतंच अनुष्काने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत सांगितले आहे की, बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने 97 चेंडूत नाबाद 103 धावा केल्या. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील हे त्याचे 48 वे शतक आहे. विराटच्या कामगिरीनंतर अनुष्काने इंडियन क्रिकेट टीमची एक पोस्ट शेअर केल्याचे बघायला मिळत आहे.

या पोस्टमध्ये टीम इंडियाने विराट कोहलीचे तोंडभरून कौतुक केले आहे. अनुष्काने ही पोस्ट शेअर केली आहे. सोबत त्या पोस्टमध्ये तिने हार्ट आणि किस करताना एक इमोजी शेअर केल्याचे दिसत आहे. सध्या तिची ही पोस्ट जोरदार चर्चेत आली आहे.

दरम्यान भारत विरुद्ध बांगलादेश या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी बांगलादेशने भारतासमोर विजयासाठी 256 धावांचं आव्हान होतं. या आव्हानाचा सामना करत असताना भारतीय संघाने दमदार सुरुवात केली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी 88 धावांची पार्टनरशिप केल्याचे बघायला मिळाले.

Short and Sweet Teaser: एका अनोख्या कुटुंबाची विलक्षण गोष्ट; ‘शॉर्ट अँड स्वीट’ सिनेमाचा टीझर प्रदर्शित

तसेच विराटचे हे वन डे क्रिकेटमधील 48 वे शतक ठरले आणि 8 वर्षानंतर त्याने पहिल्यांदाच वर्ल्ड कपमध्ये शतक झळकावले. धावांचा पाठलाग करत असताना हे त्याचे वर्ल्ड कपमधील पहिले शतक ठरले आहे. सोबतच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 26 हजार धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. विराट ने 577 इनिंग्जमध्ये हा पल्ला पार करत सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला आहे.

Tags

follow us