Short and Sweet Teaser: एका अनोख्या कुटुंबाची विलक्षण गोष्ट; ‘शॉर्ट अँड स्वीट’ सिनेमाचा टीझर प्रदर्शित

Short and Sweet Teaser: एका अनोख्या कुटुंबाची विलक्षण गोष्ट; ‘शॉर्ट अँड स्वीट’ सिनेमाचा टीझर प्रदर्शित

Short and Sweet Teaser: वडिल आणि मुलाचे नाते हे नेहमीच संवेदनशील असते. मुळात वडिल आणि मुलाचे नाते आईच्या माध्यमातून जोडले जाते. (Short And Sweet Movie) ती या दोघांमधील दुवा असते. (Social media) त्यामुळे या नात्यात खरी कसोटी असते ती आईची. (Marathi Movie) या नात्यात सुसंवाद साधला गेला तर हे नाते खूप सुंदर बहरू शकते. अशाच नात्यावर भाष्य करणाऱ्या ‘शॅार्ट अँण्ड स्वीट’चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

शुभम प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाचे गणेश कदम दिग्दर्शक आहेत. तर पायल गणेश कदम, विनोद राव निर्माते आहेत. सोनाली कुलकर्णी, हर्षद अतकरी, श्रीधर वत्सर आणि रसिका सुनील यांची गोड कथा सांगणारा हा चित्रपट येत्या ३ नोव्हेंबर दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आपल्या वडिलांना भेटण्याची तीव्र ओढ असतानाच एक अशी व्यक्ती वडिल म्हणून समोर येते, ज्याची त्याने स्वप्नातही कल्पना केलेली नसते. अशा वेळी मुलाची झालेली अवस्था, वडिल म्हणून त्यांना स्वीकारताना मनात होत असलेली चलबिचल यात पाहायला मिळणार आहेत. त्याच्या आईने इतक्या वर्षांपासून वडिलांची ओळख का?लपवून ठेवली आणि मुलगा कारण कळल्यानंतर वडिलांना स्वीकारणार का? या प्रश्नाचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावर मिळणार आहे.

या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक गणेश दिनकर कदम म्हणतात, ‘’ या चित्रपटाची कथा नावाप्रमाणेच अतिशय स्वीट आहे. वडिल मुलाच्या नात्यात नेहमीच गुंतागुंत असते. परंतु काही गोष्टी मान्य केल्या, सुसंवाद साधला तर हे नाते नक्कीच चांगले होऊ शकते. हेच दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आला आहे. हा एक कौटुंबिक चित्रपट असून यात धमालही आहे.

Raj Kundra: शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राचं ‘ते’ ट्वीट व्हायरल; म्हणाला, ‘आम्ही वेगळे झालोय…’

तसेच यूट्यूबर आणि रील विश्वातील तुषार खैर व कॉमेडी किंग ओमकार भोजणे ही पाहायला मिळतील. मनोरंजनात्मक तसेच संवेदनशील असा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शुभम प्रोडक्शन प्रस्तुत ‘शॉर्ट अँड स्वीट’ ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन गणेश दिनकर कदम यांनी केले आहे. पायल गणेश कदम व विनोद राव हे या चित्रपटाचे निर्माते असून स्वप्नील बारस्कर यांचे लेखन असून राहुल जाधव यांचे छायाचित्रण आहे. ३ ऑक्टोबर २०२३ ला ‘शॉर्ट अँड स्वीट’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube