Indian Films impact in Cannes 2024 after 30 Years : सध्या फ्रान्समध्ये प्रतिष्ठित कान्स फिल्म फेस्टिव्हल (Cannes Film Festival) जोरात सुरू आहे. (Cannes 2024) जगभरातील मनोरंजन जगतातील सेलिब्रिटी या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. त्यात यंदाचं वर्ष भारतासाठी ( Indian Films ) खास ठरलं आहे. कारण Cannes 2024 मध्ये तीस वर्षांनंतर भारतीय चित्रपटाचा ठसा उमटला आहे.
नाशकात 30 तासांची धाड, मिळालं 26 कोटींचं घबाड; पाचशेच्या नोटांचा पडला खच
जगातल्या सर्वोच्च चित्रपट महोत्सवातला एक असलेल्या कान्स महोत्सवाचा विषय हा सामान्यतः भारतीय चित्रपटांसाठी/ रसिकांसाठी थोडा आंबट द्राक्षांचा असतो. अधिकृत निवडीत आपले चित्रपटच नसतात आणि नुसतेच पेड स्क्रिनिंगसाठी गेलेले किंवा मार्केट विभागात पाठवलेले चित्रपट पोस्टरवर ऑफिशिअल सिलेक्शनचा आव आणतात. यावेळी मात्र तब्बल तीस वर्षांनंतर मुख्य स्पर्धा विभागात भारतीय फिल्म होती. एवढच नाही, तर तीन भारतीयांना कॅनला महत्वाचे पुरस्कारही मिळाले.
शरद पवारांचे शिलेदार सोडणार साथ? धीरज शर्मांचा राजीनामा, सोनिया दुहानही तयारीत
पायल कापाडीआच्या ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाईट’ चित्रपटाला मुख्य स्पर्धा विभागात ग्रान प्री पुरस्कार मिळाला. फिल्म स्कूल्ससाठी असलेल्या लघुपटस्पर्धेत चिदानंद नाईक याची ‘द सनफ्लॅावर्स वर द फर्स्ट टू नो…’ ही एफटीआयआयची निर्मिती असलेली शॅार्ट फिल्म विजेती ठरली. त्याचबरोबर बल्गेरिअन दिग्दर्शक कॅान्स्टॅन्टीन बोयानोव च्या ‘द शेमलेस’ या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल अनुसूया सेनगुप्ताला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. भारतीय अभिनेत्रीला हा पुरस्कार प्रथमच मिळाला आहे.
भारतीय चित्रपटसृष्टीसाठी तसच चाहत्यांसाठी ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. असा सहभाग यापुढेही असावा, वाढावा, अशी इच्छा आपण नक्कीच व्यक्त करु शकतो. मराठी चित्रपटांची नावंही यात दिसली तर आनंदच. छाया कदम हे आपलं अलिकडे खूप नावाजलं जाणारं नावंही ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाईट’च्या संचात आहे, ही विशेष गोष्ट आहेच.