Download App

Indian Police Force च टायटल ट्रॅक ‘जय हिंद’ रिलीज चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

Indian Police Force : आगामी वेब सिरीज इंडियन पोलीस फोर्सची (Indian Police Force) सध्या प्रचंड चर्चा सुरू आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा, शिल्पा शेट्टी कुंद्रा आणि विवेक ओबेरॉय यांच्या यामध्ये मुख्य भूमिका आहेत. रोहित शेट्टी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या वेब सिरीजची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या दरम्यान आता वेब सिरीजमधील टायटल ट्रॅक जय हिंद हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे.

Chhagan Bhujbal ओबीसी आरक्षणाचे श्रीकृष्ण, शकुनीला चिलटासारखं चिरडणार; पडळकरांचा जरांगेंवर थेट हल्ला

हे गाणं रिलीज होतात चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. रोहित शेट्टीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला. हे गाणं संगीतकार आणि गायक लिजो जॉर्ज यांनी डीजे चेतस त्याच्यासोबत मिळून तयार केलं आहे. हा व्हिडिओ शेअर करताना रोहितने लिहिलं की, जय हिंद इंडियन पोलीस फोर्स 19 जानेवारीला ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर.

लोकसभेची मोर्चेबांधणी! नगरमध्ये उद्या महायुतीचा मेळावा, नेत्यांनी लोकसभेसाठी फुंकले रणशिंग

ही वेब सिरीज भारतीय पोलीस दलावर आधारित आहे. ज्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांची निस्वार्थ देशभक्ती, प्रतिबद्धता त्याचबरोबर शहीद झालेल्या पोलिसांसाठी श्रद्धांजली अर्पण करणारी आहे. नुकताच वेब सिरीजचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. या ट्रेलरला देखील चाहत्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. तर त्यामध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यासोबत शिल्पा आणि विवेक ओबेरॉय यांची झलक पाहायला मिळाली होती. सिद्धार्थ मल्होत्रा क्षेत्रामध्ये पाऊल ठेवत आहे. तर रोहित शेट्टीचे देखील ही डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी पहिलीच वेब सिरीज आहे.

follow us