अहमदनगरः अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एंटरटेनमेंट प्रस्तुत व नरेंद्र शांतीकुमार फिरोदिया निर्मित ‘उत्सवमूर्ती'(Utsavmurti) या लघुपटाने आता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (International Film Festival of India) मोहोर उमटविली आहे. 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा लघुपट दाखविण्यात येणार आहे. हा लघुपट सध्याच्या गणेशोत्सवातील परिस्थितीवर आहे. हा लघुपट नगरमध्ये तयार करण्यात आला असून, त्यातील कलाकारही नगरमधील आहेत.
International Film Festival: 54 व्या इफ्फीमध्ये 25 फीचर अन् 20 नॉन फीचर फिल्म्स दाखवले जाणार
54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इंडियन पॅनोरमाअंतर्गत दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांची घोषणा आज करण्यात आली. यात 25 फीचर फिल्म्स आणि 20 नॉन फीचर फिल्म्स प्रदर्शित केल्या जाणार आहेत. निवडलेले चित्रपट 20 ते 28 नोव्हेंबर 2023 दरम्यान गोव्यात होणाऱ्या 54 व्या IFFI मध्ये दाखवले जाणार आहेत. त्यात नॉन फीचरमध्ये मराठीतील ‘उत्सवमूर्ती’ची निवड झाली आहे. या लघुपटाचे लेखन व दिग्दर्शन अभिजित अरविंद दळवी यांनी केले आहे. कार्यकारी निर्मिती पुष्कर तांबोळी आणि प्रणित मेढे यांची आहे.
Siddhartha Jadhav Birthday: ‘या’ दिग्दर्शकाच्या एका निर्णयामुळे बदललं अभिनेत्याचं नशीब
‘उत्सवमूर्ती’ या लघुपटात बदलत गेलेल्या गणेशोत्सवाबाबत भाष्य करण्यात आले आहे. या लघुपटासाठी खूप कष्ट घेतले होते. इफ्फीमध्ये या लघुपटाचा समावेश व्हावा, असे स्वप्न होते. इंडियन पॅनोरमासाठी या लघुपटाची निवड झाल्याने आणखी ऊर्जा मिळाली आहे. भारतातील हा एक सर्वोच्च फेस्टिव्हल आहे. याचे चित्रीकरण नगरमध्ये झालेले असून, कलाकारही नगरचे आहेत. उद्योजक नरेंद्रकुमार फिरोदिया यांची ही निर्मिती आहे. ते नेहमीच आमच्या पाठीशी उभे राहतात, अशी प्रतिक्रिया या लघुपटाचे दिग्दर्शक अभिजित दळवी यांनी दिली आहे.