Download App

‘जादू तेरी नज़र – डायन का मौसम!’ स्टार प्लस वाहिनी घेऊन येतेय…गूढ दुनिया!

  • Written By: Last Updated:

Jaadu Teri Nazar Dayan Ka Mausam On Star Plus : ‘स्टार प्लस’ (Star Plus) वाहिनीवरील बहुप्रतिक्षित ‘जादू तेरी नज़र-डायन का मौसम’ ही सुपरनॅचरल मालिका आहे. ती आता ‘जादू तेरी नजर- डायन स्लेअर या त्यांच्या गेम शोसह दाखल होत आहे. या मालिकेसह वैविध्यपूर्ण विषयांची मेजवानी प्रेक्षकांकरता पेश करत स्टार प्लस वाहिनीने चित्तवेधक आशय सादर करण्यात मुसंडी मारली (Jaadu Teri Nazar Dayan Ka Mausam) आहे. 12 फेब्रुवारी 2025 रोजी, या मालिकेसंदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी या मालिकेत अनुक्रमे विहान आणि गौरी या मुख्य पात्रांची भूमिका साकारणारे प्रमुख कलाकार झैन इबाद खान आणि खुशी दुबे हे उमदे कलाकारही उपस्थित होते.

या कार्यक्रमात ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या लोकप्रिय मालिकेतील मुख्य कलाकार समृद्धी शुक्ला (अभिरा) आणि रोहित पुरोहित (अरमान) तसेच ‘उडने की आशा’ मालिकेतील कंवर ढिल्लन (सचिन) आणि नेहा हरसोरा (सायली) हे लोकप्रिय कलावंतही सहभागी झाले (Entertainment News) होते. या कलाकारांनी या मालिकेच्या उद्घाटनपर कार्यक्रमादरम्यान आयोजित विविध रंजक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला.

शिंदेंच किंगमेकर! सामंत बंधू अन् साळवीत घडवला समेट; पडद्यामागची स्टोरी काय?

माध्यमांशी संवाद साधताना, झेन इबाद खान आणि खुशी दुबे यांनी त्यांच्या भूमिका, मालिकेचा सुपरनॅचरल परिसर आणि विहान अन् गौरी यांच्या नात्याचा रोमांचक प्रवास कथन (Hindi Serial) केला. झेन आणि खुशी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर एकत्र झळकल्याने प्रेक्षकांना आनंद झाला आहे, याचे कारण काळ्या शक्तीच्या आणि गूढ वळणांच्या जगात अडकलेल्या या पात्रांचे चित्रण करताना त्यांच्यातील निर्विवाद मैत्री पुन्हा जिवंत होईल, असे प्रेक्षकांना वाटते.

‘जादू तेरी नज़र – डायन का मौसम’ ही मालिका विहान आणि गौरी यांच्या गुंतागुंतीच्या, मात्र स्वारस्यपूर्ण जगाची सफर प्रेक्षकांना घडवून आणण्याकरता सज्ज झाली आहे. ज्यात या दोन्ही पात्रांना एकत्र आणणाऱ्या नशिबाच्या वळणांवर प्रकाशझोत टाकला जाईल. त्यांचे नशीब परस्परांशी कसे जुळते हे ‘जादू तेरी नज़र – डायन का मौसम’ मालिकेत पाहायला मिळेल. या प्रवासात ते प्रचंड आव्हानांना कसे सामोरे जातात, त्यांच्या नशिबाला कशी दिशा मिळते, याचे रंजक दर्शनही प्रेक्षकांना होईल.

आज पुन्हा निवडणुका झाल्या तर… जनतेचा कौल कोणाला? सर्वेक्षणातून धक्कादायक खुलासा

आकर्षक वळणे, जादुटोण्याची शक्ती, आणि आतुरता, आश्चर्य अनुभवायला मिळणारी ही मालिका प्रेक्षकांना असे जग पाहायला आमंत्रित करते, जिथे हरेक जादू नशिबाचा मार्ग बदलू शकते. ‘जादू तेरी नज़र – डायन का मौसम’ ही मालिका ‘स्टार प्लस’ वाहिनीवर 18 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होतेय. प्रेक्षकांना जादू, आश्चर्य, आणि प्रेमाच्या एका अजब, रोमांचक प्रवासाला घेऊन जाण्याचे आश्वासन ही मालिका देते.

 

follow us