Download App

Jacky Shroff ला चाहत्यांच्या ह्रदयाचा ‘हिरो’ बनवणाऱ्या ‘हिरो’ ला 40 वर्ष पूर्ण

  • Written By: Last Updated:

Jacky Shroff : अभिनेता जॅकी श्रॉफ (Jacky Shroff) आणि अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री या दोघांनाही खरी ओळख देणारा चित्रपट म्हणजे ‘हिरो’. या चित्रपटला प्रदर्शित होऊन आज 40 वर्ष पूर्ण झाली. 1983 ला याच दिवशी हा चित्रपट चाहत्यांच्या भेटीला आला होता. सिल्व्हर स्क्रनवर धुमाकुळ घातला होता. याच चित्रपटामध्ये अभिनेता जॅकी श्रॉफ याने मुख्य अभिनेता म्हणून डेब्यू केला होता. तर अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री हीला देखील याच चित्रपटामुळे खरी ओळख मिळाली आहे.

धारावी प्रकल्पात घोटाळा झाला असेल तर ते पाप उद्धव ठाकरेंचं; आशिष शेलारांची टीका

सुभाष घई यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. तर जॅकी श्रॉफच्या करिअरवर या चित्रपटाने मोठा परिणाम केला. या चित्रपटामुळे जॅकी श्रॉफला एक प्रॉमिसिंग अॅक्टर म्हणून ओळख मिळाली. तसेच जॅकी श्रॉफ देखील या चित्रपटबद्दल सांगताना म्हणतात की, या चित्रपटापासून आज पर्यंतचा माझा प्रवास अवर्णनीय राहिला. हा चित्रपट माझ्या करिअरमधील एक माईलस्टोन ठरला आहे.

Sonu Sood च्या चाहत्यांचं अनोखं गिफ्ट; ‘मैं भी सोनू सूद’ मोहिमेनी गाठली मुंबई

याच चित्रपटाने जॅकी श्रॉफ एका रात्रीतून हिरो झाल्याचं सांगितलं जात. चित्रपटाला प्रचंड यश मिळालं. हा चित्रपट एक रोमॅंटीक ड्रामा चित्रपट होता. या चित्रपटात सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलं ते बासरीच्या स्वरांनी ही धून कशी तयार झाली. त्याचा किस्सा सांगताना सुभाष घई म्हणाले होते की, मी जेव्हा चित्रपटाबद्दल लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना सांगितलं. तेव्हा ते म्हणाले की, या चित्रपटाचं संगीत कायम लक्षात राहिल असं असायला हवं. त्यामुळे या बासरीची धून लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी कंपोज केली तर प्रसिद्ध बासरीवादक हरिप्रसाद चौरासिया यांनी यासाठी बासरी वादन केलं होतं.

Tags

follow us