Jahir Jhala Jagala Song Release: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आयुष्यावर आधारित ‘येक नंबर’ (Yek Number Movie) सिनेमा येत्या 10ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. (Marathi Movie) ‘येक नंबर’ सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. (Jahir Jhala Jagala Song) अभिनेता धैर्य घोलप या सिनेमात प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. नुकतंच ‘येक नंबर’ सिनेमातील प्रेमगीत प्रदर्शित झालं आहे.
अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) आणि वरदा नाडियावाल (Varada Nadiawal) यांनी ‘येक नंबर’ सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळली. तर राष्ट्रीय पुरस्कार विजेते राजेश मापुस्कर यांनी दिग्दर्शित केला आहे. या सिनेमात धैर्य घोलपसह अभिनेत्री सायली पाटील बघायला मिळणार आहे. या सिनेमातील दोघांचं प्रेमगीत आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘जाहीर झालं जगाला…’ असं प्रेमगीताचं नाव असून संगीत क्षेत्रातील सुप्रसिद्ध जोडी अजय-अतुलने हे गाणं संगीतबद्ध केल्याचे सांगितले जात आहे.
‘प्रेम जे पाण्याइतकं नितळ आणि आभाळा एवढं विशाल असतं…असं प्रेम तुमच्यावर कोणी करायला लागलं ना लय भारी वाटतं…एकदम येक नंबर…” या सुंदर डायलॉगने गाण्याची सुरुवात करण्यात आली आहे. पिंकी आणि प्रतापमधील रोमँटिक क्षण या गाण्यात आहेत. अजय गोगावले आणि श्रेया घोषाल यांनी हे गाणं गायलं आहे. तर ‘स्वप्नातल्या चांदण्याचं…लागीर झालं जीवाला…झाकून होतं मनाशी…जाहीर झालं जगाला’ या सुंदर ओळी गीतकार गुरू ठाकूर यांनी लिहिले आहेत.
‘येक नंबर’ सिनेमातील ‘जाहीर झालं जगाला…’ या प्रेमगीताला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या काही तासांत युट्यूबवर या गाण्याला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. अजय गोगावले आणि श्रेया घोषालच्या आवाजाच तोंडभरून कौतुक केलं जात आहे. एका युजरने लिहिले आहे की, “किती शॉर्ट आणि सिम्पल गाणं आहे. डोक्यातून अजून चाल जात नाहीये.” तर दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की, “हे गाणं खूप छान आहे. गाण्याचे बोल लक्षवेधी आहेत.” अशा प्रकारे अनेकांनी या गाण्याचे तोंडभरून कौतुक करत आहे.
Yek Number : ‘येक नंबर’च्या टिझरमधील ‘त्या’ आवाजाने वेधले सर्वांचे लक्ष
दरम्यान, दसऱ्याच्या औचित्यावर ‘येक नंबर’ सिनेमा प्रदर्शित होत आहे. निर्माती तेजस्विनी पंडित या सिनेमाबद्दल म्हणाली होती की, “प्रेक्षकांची अनेकदा तक्रार असते की, मराठी सिनेमामध्ये तांत्रिकदृष्ट्या, सादरीकरणात भव्यता नसते. हाच समज दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या सिनेमात अनेक कुशल, सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञांचा सहभाग आहे. ही भव्यता प्रेक्षकांना पडद्यावर नक्कीच पाहायला मिळणार आहे. या सगळ्याचे श्रेय या सिनेमाशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकाला जाते.