Yek Number : ‘येक नंबर’च्या टिझरमधील ‘त्या’ आवाजाने वेधले सर्वांचे लक्ष

  • Written By: Published:
Yek Number : ‘येक नंबर’च्या टिझरमधील ‘त्या’ आवाजाने वेधले सर्वांचे लक्ष

Yek Number : सुरुवातीलाच प्रचंड जनसमुदायाने भरलेली सभा…  महाराष्टाच्या लाडक्या व्यक्तिमत्वाची झलक… जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो, भगिनींनो आणि मातांनो, हा अवघ्या महाराष्ट्राच्या ओळखीचा कणखर आवाज… उत्साह… दिसत आहे. तर दुसऱ्या क्षणी दंगल, मारामारी, जाळपोळ, धुडगूस दिसत असून ‘ठाकरे साहेब’ असा हलकासा आवाजही कानावर येत आहे.

झी स्टुडिओज् आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स निर्मित ‘येक नंबर’ (Yek Number) या चित्रपटाचा भन्नाट टिझर नुकताच प्रदर्शित झाला असून हा टिझर पाहून प्रेक्षकांच्या मनात आता असंख्य प्रश्न उपस्थित होत आहेत आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरे येत्या 10 ऑक्टोबरला प्रेक्षकांना मिळणार आहेत. जेव्हा पासून या चित्रपटाचा पोस्टर रिलीज करण्यात आला आहे तेव्हापासून या चित्रपटाची सर्वत्र सुरू झाली आहे.

यातच पोस्टरमधील करारी नजर आणि त्यात भर टाकली आहे ती पोस्टरमधील बुलंद आवाजाने. त्यामुळे हा चित्रपट कोणाचा बायोपिक आहे का? हे जाणून घेण्याची  प्रत्येकालाच प्रचंड उत्सुकता आहे. तर दुसरीकडे या टिझरमध्ये सायली पाटीलची देखील झलक दिसली आहे.  या चित्रपटाच्या तेजस्विनी पंडित आणि  साजिद नाडियाडवाला निर्मात्या आहेत तर राष्ट्रीय पुरस्कार विजेते राजेश मापुस्कर यांनी या चित्रपटाचे दिग्दशक आहे. तर अजय-अतुल यांनी या चित्रपटात म्युझिक दिला आहे.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक राजेश मापुस्कर म्हणतात,  ”ही स्टोरी जेव्हा मी ऐकली तेव्हा मला वाटले, मला काही सांगायची आणि काही नवीन पद्धतीने गोष्ट मांडायची संधी आहे. प्रेक्षकांना ही माझी मांडणी कशी वाटेल, या बद्दल खूप उत्सुकता आहे.’’ झी स्टुडिओजचे बिझनेस हेड बवेश जानवलेकर म्हणाले की, आजवर झी स्टुडिओजने  मराठी सिनेसृष्टीला अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहे. स्टोरी कोणत्याही चित्रपटाची आत्मा असते आणि या चित्रपटाची स्टोरी अत्यंत प्रभावी आहे आणि त्याला सर्वच कलाकारांनी उत्तम न्याय दिला आहे. तसेच हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीतील इतिहासात माईलस्टोन चित्रपट ठरेल. असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

निर्माती तेजस्विनी पंडित म्हणतात, ” चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अनेकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. टिझरला मिळणारा प्रतिसाद पाहाता चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, अशी खात्री आहे. मराठी प्रेक्षक कथानकाला विशेष प्राधान्य देतात. ‘येक नंबर’ची कथा अतिशय कमाल असून ही कथाच या चित्रपटाचा नायक आहे. अशा प्रकारचा प्रयत्न मराठीत यापूर्वी कधीही झाल्याचे मला आठवत नाही.’’

नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटच्या वरदा साजिद नाडियाडवाला म्हणतात, ” वेगवेगळ्या भाषांमध्ये काम करण्यासाठी मी नेहमीच खूप उत्सुक असते आणि विशेषतः मराठी भाषेत. मराठी भाषेकडे साहित्याचा मोठा खजिना आहे.

नाथाभाऊ, ‘हा’ देवेंद्र फडणवीसचा शब्द, राज्यपालपदावरून एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

आणखी एका कारणासाठी मला मराठी भाषा हृदयाच्या खूप जवळची वाटते, ते म्हणजे माझे पूर्वज हे महाराष्ट्रातील आहेत. म्हणूनच मी हा चित्रपट करण्याचे ठरवले आणि अशा चित्रपटाचा मी भाग होतेय, याचा मला अत्यानंद आहे. ”

follow us
  • fb
  • instagram
  • youtube