Tejaswini Pandit : ‘टोल’वरुन तेजस्विनी आक्रमक होताच, सोशल अकाउंटवर कारवाई; मनसे मदतीला…

Tejaswini Pandit : ‘टोल’वरुन तेजस्विनी आक्रमक होताच, सोशल अकाउंटवर कारवाई; मनसे मदतीला…

Tejaswini Pandit : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (MNS)टोलमाफीचा मुद्दा पुन्हा उचलून धरला आहे. त्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी चांगलेच कात्रीत पकडले आहे. त्याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी माध्यमांसमोर मांडलेली भूमिका आणि प्रत्यक्षात असलेली भूमिका यामध्ये वेगळेपण दिसून येत आहे. यावरुन मनसे आक्रमक झाली आहे. याच मुद्द्यावरुन मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit)हिने स्पष्ट भूमिका घेतली. त्यानंतर मात्र तेजस्विनीच्या एक्स अकाऊंटचं व्हेरिफिकेशन बॅग काढून टाकल्याचा आरोप अभिनेत्री तेजस्वीनी पंडित हिने केला आहे.

इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा पीएम नरेंद्र मोदींना फोन, दोघांत काय चर्चा झाली?

तेजस्विनीने आपल्या X अकाउंटवर म्हटलं की, म्हणजेऽऽऽऽऽऽऽ ??????? ह्यांना कळतंय ना नेमकं हे काय बोलतायत ?? मग इतके वर्ष आम्ही जो टोल भरतो आहोत तो कुणाच्या खिशात जातोय? राजसाहेब तुम्हीच आता काय ते करा, महाराष्ट्राला वाचवा ह्या टोल धाडीतून! असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आवाहन केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं कसं वागू शकतात? तेजस्विनीच्या या पोस्टची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली.

त्यानंतर आता तेजस्वीनीने आपल्या X अकाउंटवर आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. तीने आपल्या दुसऱ्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, कोंबडं झाकल्याने सूर्य उगवायचा राहात नाही, असं म्हणत तीने आपल्याबरोबर घडलेल्या गोष्टीची माहिती दिली आहे.

पोस्टमध्ये म्हटलंय की, माझ्या X (ट्विटर अकाऊंटचं व्हेरिफिकेशन काही लोकांनी माझं स्पष्ट मत सहन न झाल्याने राजकीय दबाव टाकून काढून टाकण्यास सांगितलं. कारण का तर मी एक ‘आम्हा जनतेची’ इतकी वर्ष फसवणूक झाली असा वाटणारा प्रश्न उपस्थित केला म्हणून?

X (टूट्विटर) अकाउंटचा व्हेरिफिकेशन बॅच हा सन्मान असेल तर तो योग्य कारणासाठी जाणं, हा त्याहून मोठा सन्मान मला दिलात, त्याबद्दल धन्यवाद. पण ह्या बंदीने माझा काय किंवा सामान्य माणसांच्या मनातील आक्रोश कमी होणार नाही.

सामान्यांचा आवाज बंद करणे हाच ह्यांचा बहुदा एकमात्र ‘X’ फॅक्टर आहे हे मात्र स्पष्ट होत जाईल. असो, माझा ‘जय हिंद जय महाराष्ट्र’साठीचा घोष योग्यवेळी सुरूच राहील. सत्तेत कोणीका बसेना, आम्ही जनता आहोत! जेंव्हा जेंव्हा आमची पिळवणूक होईल, दिशाभूल होईल, तेव्हा तेव्हा आमचा आवाज दुमदूमणारच आहे ! जय हिंद जय महाराष्ट्र!, असे तेजस्वीनीने म्हटले आहे.

तेजस्विनीला मनसेनंही साथ दिली असून तेजस्विनीची पोस्ट रिशेअर करत सरकारवर निशाणा साधला आहे. आता तेजस्विनीच्या मदतीला मनसे पुढे सरसावली आहे. मनसे अधिकृतच्या X अकाऊंटवरुन तेजस्विनीची ती पोस्ट रिशेअर करुन सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. यामध्ये म्हटलं आहे की, अनेकदा आपण पाहिलं आहे अगदी ऑस्कर स्वीकारतानाही जागतिक व्यासपीठावर कलावंत सभोतालच्या सामाजिक परिस्थितीबद्दलच नव्हे तर थेट राजकीय भूमिका घेतानाही कचरत नाहीत.

कारण त्या देशातील लोकशाही त्या कलावंतांना हमी देते कि तुम्ही घेतलेल्या भूमिकेसाठी तुमच्यावर कोणताही सूड उगविला जाणार नाही. आपण जगातील सर्वात मोठी लोकशाही स्वतःला म्हणवतो आणि आमच्या हल्लीच्या राज्यकर्त्यांना किंचितशीही टीका सहन होत नाही.

काल सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित ह्यांनी टोलबाबत’फसविले गेल्याची’ भावना बोलून दाखवली… अर्थात त्या प्रतिक्रियेचा रोख राज्यकर्त्यांकडे जाणार ना… पण त्या एका प्रतिक्रियेनंतर त्यांचा X अकाउंटवरचा व्हेरिफिकेशन बॅज काढून घेतला गेला.

ह्यासाठी कुठून सूत्र हलली असतील हे आम्ही वेगळं सांगायची गरज नाही. म्हणून त्यांनी काल घेतलेल्या भूमिकेचं स्वागतच पण त्यानंतर आज न घाबरता दाखविलेला ठामपणाही कौतुकास्पदच… सत्तेला प्रश्न विचारणाऱ्या अशा निर्भीड कलावंतांना कायम सलाम करावासा वाटतो… मग ते रंगभूमीवर भूमिका वठवताना असो वा थेट सामाजिक, राजकीय भूमिका घेताना असो, जय महाराष्ट्र!

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube