Download App

भाग्य दिले तू मला फेम Jahnavi Killekar च्या घरी चोरांचा धुडगूस; म्हणाली आईला धक्का बसल्याने…

Jahnavi Killekar च्या घरामध्ये चोरी झाली आहे. त्याबद्दल स्वतः जान्हवीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ शेअर करत माहिती दिली.

Jahnavi Killekar Home theft mother paralise Attack : कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका भाग्य दिले तू मला फेम अभिनेत्री जान्हवी किल्लेकर (Jahnavi Killekar) तिच्या घरामध्ये चोरी (Home theft) झाली आहे. त्याबद्दल स्वतः जान्हवीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ शेअर करत माहिती दिली.

ठरलं! राहुल गांधी पंढरीच्या वारीत होणार सहभागी; तारीख आली समोर

यावेळी बोलताना जान्हवीने सांगितले की, पेनमध्ये आमचे घर आहे जिथे आम्ही आठवड्यातून एकदा जातो. माझ्या घरामध्ये चोरी झाली असून चोरांनी अनेक मौल्यवान वस्तू चोरून नेल्या आहेत. ज्यामध्ये माझ्या भावाची घड्याळं, आईच्या साड्या यांचा देखील समावेश आहे. अशाप्रकारे चोरी होण्याची आमच्या आयुष्यातील पहिलीच घटना आहे. त्यामुळे आईने या घटनेचा धक्का घेतल्याने तिला अर्धांग वायूचा झटका आला आहे. त्यामुळे तुमचे देखील असे एखादा बंद घर असेल तर काळजी घ्या. सध्या चोरांचा प्रचंड सुळसुळाट झाला आहे. असं आवाहन यावेळी जान्हवीने प्रेक्षकांना केलं.

मविआचा प्लॅन उलटणार की महायुतीला धक्का देणार? विधानपरिषदेचं गणित कुठे फसणार..

दरम्यान भाग्य दिले तू मला या मालिकेत जान्हवीने खलनायिकेची भूमिका साकारली होती. ज्यामुळे ती घराघरात पोहचली. नुकतंच काही दिवसांपूर्वी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे मात्र या मालिकेतील सर्वच कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चहा त्यांच्या संपर्कात असतात. त्यामध्येच आता घरामध्ये चोरी (Home theft) झाली आहे. त्याबद्दल स्वतः जान्हवीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ शेअर करत माहिती दिल्याने तिचे चाहते तिला काळजी घेण्याचं आवाहन करत आहेत.

follow us

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज