Data Theft: 66.9 कोटी लोकांच्या डेटाचा लिलाव, देशातील 24 राज्ये आणि 8 मेट्रो शहरे लक्ष्य
Data Theft: तेलंगणातील सायबराबाद पोलिसांनी डेटा चोरीच्या एका मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. सायबराबाद पोलिसांना त्याच्याकडून66.9 कोटी लोक आणि कंपन्यांचा डेटा मिळाला आहे. देशातील 24 राज्ये आणि 8 महानगरांच्या 104 श्रेणींमध्ये ही आकडेवारी सांगितली जात आहे.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, हा व्यक्ती खाजगी आणि गोपनीय डेटा बेकायदेशीरपणे काढायचा, त्यानंतर त्याने तो विकला. या व्यक्तीकडे बायजू आणि वेदांतूच्या विद्यार्थ्यांचा डेटाही होता. याशिवाय 8 मेट्रो शहरांमध्ये कॅब वापरणाऱ्या 1.84 लाख लोकांचा डेटाही त्या व्यक्तीकडे उपलब्ध होता. एवढेच नाही तर गुजरातच्या 6 शहरांतील साडेचार लाख नोकरदारांचा डेटाही त्या व्यक्तीकडे उपलब्ध होता.
जीएसटी, आरटीओ, अॅमेझॉनने कुणालाही सोडले नाही
आरोपींकडून अनेक बड्या कंपन्यांचा डेटा जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये जीएसटी, आरटीओ, अॅमेझॉन, नेटफ्लिक्स, यूट्यूब, पेटीएम, फोनपे, बिग बास्केट, बुक माय शो, इंस्टाग्राम, झोमॅटो, पॉलिसी बाजार, अपस्टॉक अशा अनेक मोठ्या कंपन्यांच्या नावांचा समावेश आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये आज महाविकास आघाडीची जाहीर सभा; संपूर्ण राज्याचं लक्ष
सायबराबाद पोलिसांनी सांगितले की, आरोपीकडे, सरकारी कर्मचारी, पॅनकार्डधारक, 9वी-10वी-11वी-12वीचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिल्लीतील वीज ग्राहक, डी-मॅट खाते चालवणारे लोक यासह अनेक लोक आरोपींच्या संपर्कात होते. क्रेडिट आणि डेबिट कार्ड धारकांचे मोबाईल नंबर, डेटा देखील आरोपीकडून हस्तगत करण्यात आला आहे.
नेटवर्क हरियाणातून चालत होते
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनय भारद्वाज असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपी हरियाणातील फरिदाबाद येथून InspireWebz नावाच्या वेबसाईटद्वारे आपले नेटवर्क चालवत होता. पोलिसांनी सांगितले की, आरोपी क्लाउड ड्राईव्ह लिंकद्वारे ग्राहकांना डेटा विकायचा. त्याला हा डेटा आमिर सोहेल आणि मदन गोपाल यांच्याकडून मिळाला.
आरोपीच्या अटकेनंतर माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, आरोपींकडून नीट (NEET) च्या विद्यार्थ्यांचा डेटाही जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींकडून दोन मोबाईल आणि दोन लॅपटॉपही जप्त केले आहेत.