Bigg Boss Marathi : ‘मी एकमेव आहे जी निक्किशी भांडू शकते..’, जान्हवीने सांगितले आर्याला

Bigg Boss Marathi : ‘मी एकमेव आहे जी निक्किशी भांडू शकते..’, जान्हवीने सांगितले आर्याला

Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli Aarya Jadhav : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात (Bigg Boss Marathi New Season) आता एकमेकांना बद्दल गॉसिपिंग करणे सुरू झाले आहे. (Bigg Boss Marathi) रितेश भाऊंनी (Ritesh Deshmukh) दिलेल्या शिक्षेनंतर जान्हवी (Jahnavi Killekar) गार्डन एरियामध्ये कैद आहे. नुकत्याच आलेल्या प्रोमोत आपण पाहू शकतो की, आर्या (Aarya Jadhav) जान्हवीशी बोलत बसलेली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)


आर्या जान्हवीला बोलते की, (Bigg Boss Marathi New Promo) मी निक्कीला बोलली की, आता पॉसिबल आहे की तू येवढ्या ठाम डिसिजनवर आली आहेस की, तुला आता जान्हवीसोबत नाही बोलायचे आहे. आताच तुझ्यामध्ये एवढा बदल होऊ शकतो. तर , तुझे जे खरे व्यक्तीमहत्व आता दिसू शकते. त्यावर जान्हवी म्हणाली की,” माझा गेम आता पर्यंत एकदम क्लिअर होता. मी एकमेव अशी व्यक्ती आहे जी निक्कीच्या समोर भांडू शकते कचाकच. त्यावर आर्या म्हणते की,” सगळे जण तूझी फक्त ॲक्शनच दाखवू शकतात की… जान्हवी काय आहे आणि सगळ्यांना हेच पाहायचे आहे.

घरातील सदस्यांचा दुष्मन कोण?

‘बिग बॉस मराठी’ च्या नव्या प्रोमोमध्ये (Bigg Boss Marathi New Promo) आर्या अरबाजला म्हणत आहे, आता आपल्या सर्वांचा मेन दुष्मन एकच झालाय. त्यावर अरबाज निक्की असं उत्तर देतो. आर्या अरबाजला पुढे म्हणते,”विसरू नकोस”. अरबाज म्हणतो,”निक्कीला खूप त्रास द्यायचाय”. त्यावर आर्या म्हणते,”हो…पूर्णपणे”. अरबाज पुढे म्हणतो,”तू अभिजीतला इतका त्रास दे तिला काही नाही होणार”. यावर निक्की आणि आर्याला म्हणते,”किव येते मला त्या लोकांची.

‘बिग बॉस मराठी’चा आजचा भाग खूपच रंजक असणार आहे. या आठवड्यात निक्कीचा चांगलाच बोलबाला आहे. काल इरिना बाहेर पडल्यानंतर आता या आठवड्यात कोणता सदस्य बाहेर पडणार याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.

Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्यांचा दुष्मन कोण? जाणून घ्या

‘बिग बॉस मराठी’च्या घरावर आलंय मोठं संकट

‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो घाबरवणारा आहे. या नव्या प्रोमोमध्ये बिग बॉसने सांगितले आहे की, “सावधान… या घरावर आलंय एक मोठं संकट… तो आलाय.. मानकाप्या…”. या नव्या प्रोमोमध्ये घरातील सर्व सदस्यांची झोप उडालेली असून ते चांगलेच घाबरलेले असल्याचे पाहायला मिळाले आहे. तसेच घरात एका आरश्यावर लिहिलेलं आहे की, “एकटं फिरू नका…नाहीतर..मानकाप्या”.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube