Download App

Box Office Collection: मायबाप प्रेक्षकांचे प्रेम पाहून थलायवा, सनी पाजी अन् अभिषेक बच्चन भारावले!

Box Office Collection : सध्या संपूर्ण मनोरंजनसृष्टी बहरलेली असल्याचे बघायला मिळत आहे. बॉलिवूड अभिनेता सनी पाजी आणि अमिषा पटेल यांचा ‘गदर 2’ (Gadar 2), बॉलिवूडचा खिलाडीचा ‘ओएमजी 2’ (OMG 2) आणि दाक्षिणात्य सुपरस्टार थलायवाचा ‘जेलर’ (Jailer) आणि आता अभिषेक बच्चनचा ‘घूमर’ (Ghoomer) हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर जोरदार धमाका करत असल्याचे बघायला मिळत आहे. मल्टिस्क्रीन असो किंवा सिंगल स्क्रीन असो… सगळीकडील सिनेमागृहात सध्या चाहत्यांची प्रचंड गर्दी बघायला मिळत आहे.

सध्या तुडुंब गर्दी पडत असल्याने सिनेमाच्या पडद्याला अक्षरश: सोन्याचे दिवस आल्याचे दिसत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये काही सिनेमे चालत नसल्याची ओरड होत होती. परंतु ‘बाईपण भारी देवा’ हा मराठी सिनेमा आला आणि थिएटर्सचा कमाईत वाढ होण्यास सुरुवात झाली. सध्या परदेशातून आलेल्या ‘मिशन इम्पॉसिबल’ आणि ‘बार्बी’, ‘ओपनहायमर’ या सिनेमांनीही इम्पॉसिबल म्हणता येणार आहे. सनी पाजींचा ‘गदर 2’… ज्या दणक्यात ‘गदर-2’ मध्ये फायटिंग दाखवली. तेवढ्याच दणक्यामध्ये सिनेमाची कमाई झाली आहे.

एकूणच, सध्या मनोरंजनसृष्टीला सोन्याचे दिवस आल्याचे बघायला मिळत आहे. साऊथ सुपरस्टार थलायवा यांची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. प्रदर्शितच्या ११ दिवसामध्ये देशात या सिनेमाने (Box Office Collection) २८०.८५ कोटींचा गल्ला कमावला आहे. तर दुसरीकडे जगभरात या सिनेमाने ५०७.४ कोटींची जोरदार कमाई केली आहे. थलायवा सिर्फ नाम ही काही है असं म्हणत चाहते त्यांच्या लाडक्या अण्णाचा सिनेमा बघायला जात असल्याचे दिसत आहेत.

‘OMG 2’चे बॉक्स ऑफिसवर दमदार कलेक्शन, 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील

तसेच साऊथच्या सिनेमाच्या बॉक्स ऑफिसवर बोलबाला असताना बॉलिवूड सिनेमांची क्रेझ सिनेप्रेमींमध्ये असल्याचे बघायला मिळाले. खिलाडीच्या आणि पंकज त्रिपाठी यांचा ‘ओएमजी 2’ या सिनेमाने ११४.३१ कोटींचा गल्ला कमावला आहे. तर सनी पाजी आणि अमिषा पटेल यांच्या ‘गदर 2’ या सिनेमानेचा देखील बॉक्स ऑफिसवर ३७७.२ कोटींची कमाई केली आहे. तसेच अभिषेक बच्चनचा ‘घूमर’ या सिनेमाने देखील प्रदर्शितच्या ३ दिवसांत ३.४७ कोटींची कमाई केल्याचे बघायला मिळाले आहे.

Tags

follow us