‘OMG 2’चे बॉक्स ऑफिसवर दमदार कलेक्शन, 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील

‘OMG 2’चे बॉक्स ऑफिसवर दमदार कलेक्शन, 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील

OMG 2 Box Office Collection : ‘गदर 2’ सोबतच 11 ऑगस्टला रिलीज झालेला बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठीचा ‘OMG 2’ नेही बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. कदाचित ‘गदर 2’ आणि ‘OMG 2’ एकाच वेळी रिलीज झाले नसते तर ‘OMG 2’च्या कमाईची आकडेवारी वेगळी असती. गुरुवार आणि शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी ‘OMG 2’च्या कमाईत मोठी वाढ झाली.

पंकज त्रिपाठी आणि अक्षय कुमार यांच्या ‘ओह माय गॉड 2’ या चित्रपटाने 9 दिवसात 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी चित्रपटाच्या कमाईत मोठी घसरण झाली होती, ती शनिवारी पुन्हा एकदा सावरताना दिसत आहे. या चित्रपटाने दुसऱ्या शनिवारी 10.50 कोटींची कमाई केली असून यासोबतच तो 100 कोटी क्लबमध्ये सामील झाला आहे.

सनी पाजीने थकवले कोट्यावधींचे कर्ज; बँकेने थेट धाडली घराच्या लिलावाची नोटीस

रिलीज झाल्यापासून दुहेरी अंकात सुरू असलेली कमाई सहाव्या दिवसापासून अचानक सिंगल डिजिटमध्ये येऊ लागली. चित्रपटाने बुधवारी 7.2 कोटी, गुरुवारी 5.58 कोटी आणि शुक्रवारी 6.03 कोटी रुपयांची कमाई केली. आता पुन्हा एकदा दुसऱ्या वीकेंडच्या सुरुवातीला दुहेरी अंकात कमाई केली. ‘OMG 2’ ने 9 दिवसात 101.58 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

मोठी बातमी! रशियाचे मून मिशन फेल; ‘लूना 25’ चंद्रावरच झालं क्रॅश

ओ माय गॉड 2 च्या आठ दिवसांच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर पहिल्या दिवशी 10.26 कोटी, दुसऱ्या दिवशी 15.3 कोटी, तिसऱ्या दिवशी 17.55 कोटी, चौथ्या दिवशी 12.06 कोटी, पाचव्या दिवशी 17.1 कोटी, पाचव्या दिवशी 7.2 कोटी कमाई केली आहे. सहाव्या दिवशी 5.58 कोटी, सातव्या दिवशी आणि 8व्या दिवशी 6.3 कोटींची कमाई केली आहे. तर चित्रपटाची पहिल्या आठवड्याची कमाई 85.05 कोटी आहे.

‘जेलर’च्या यशानंतर सुपरस्टार रजनीकांत श्रीरामाच्या दर्शनाला; योगींचीही घेतली भेट

गदर 2 आणि जेलरची पहिल्या आठवड्याची कमाई OMG 2 पेक्षा दुप्पट आहे. यामुळे चित्रपटावर परिणाम झाला आहे. दोन हिट चित्रपटांच्या दरम्यान 100 कोटींची कमाई करणे ही देखील मोठी गोष्ट आहे. पण 150 कोटींच्या बजेटमध्ये बनवलेला OMG 2 हा आकडा पार करू शकेल की नाही हे पाहावे लागेल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube