मोठी बातमी! रशियाचे मून मिशन फेल; ‘लूना 25’ चंद्रावरच झालं क्रॅश
Luna 25 : भारतानंतर चंद्रमोहिम आखत चंद्राच्या दिशेने वेगात निघालेले रशियाचे लूना 25 (Luna 25) क्रॅश झाले आहे. या घटनेनंतर रशियाच्या मून मिशनला (Moon Mission) मोठा झटका बसला आहे. लूना 25 चंद्राच्या मार्गावरून भरकटल्याच्या बातम्या येतच होत्या. त्यानंतर मात्र आता यान क्रॅश झाल्याची अधिकृत माहिती हाती आली आहे. जर्मनीच्या डीडब्ल्यू न्यूजने अंतरिक्ष संस्था रोस्कोस्मोसच्या हवाल्यने म्हटले आहे की रशियाचे लूना 25 अंतरिक्ष यान क्रॅश झाले आहे. लूना 25 अंतराळात भरकटल्याचे सांगण्यात येत होते. यानात काही तांत्रिक बिघाड झाल्याच्याही बातम्या आल्या होत्या.
ठरलं तर! बुधवारी ‘या’ वेळेला चंद्रावर उतरणार चांद्रयान; ISRO ने केलं कन्फर्म
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांची ही अत्यंत महत्वाकांक्षी मोहिम होती. लूना 25 चंद्राच्या कक्षेतच फिरत होते आणि लवकरच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यास सज्ज झाले होते. मात्र त्याआधीच यान क्रॅश झाले. रशियाने या मोहिमेसाठी भारतापेक्षा जास्त खर्च केला होता. तसेच लूना 25 भारताच्या चांद्रयान 3 च्या आधीच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार असल्याचेही सांगण्यात येत होते.
लूना 25 ने कक्षा बदललीच नाही
रशियाने ही मोहिम चंद्रावरील खडक आणि धुळीचे नमुने गोळा करण्यासाठी आखली होती. मात्र रशियाच्या वेळेनुसार 2 वाजून 10 मिनिटांनी अंतिम डी – बुस्टींगवेळी यानाचा अंतराळ संस्थेबरोबरील संपर्क तुटला. लूना 25 उद्या (सोमवार) चंद्रावरील दक्षिण ध्रुवावर उतरणार होते. लँडिंगच्या आधी कक्षा बदलली जाणार होती. मात्र तांत्रिक अडचणी आल्याने असे होऊ शकले नाही.
चांद्रयान-3 च्या कॅमेऱ्याने टिपले चंद्राचे अदभूत फोटो, इस्रोने शेअर केला व्हिडिओ
तब्बल 47 वर्षांनंतर चंद्रावर धाडले होते यान
सन 1976 मध्ये तत्कालीन सोव्हिएत संघाने लूना 24 मिशन लाँच केले होते. त्यानंतर तब्बल 47 वर्षांनंतर लूना 25 यानाला चंद्रावर रवाना करण्यात आले होते. भारताच्या तुलनेत लूना 25 ने चंद्रावर जाण्यासाठी सरळ मार्ग निवडला होता. त्यानुसार रशियाचे यान दोन दिवस आधीच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार होते. विशेष म्हणजे भारताचे चांद्रायान 3 दोन दिवसांनंतर म्हणजेच बुधवारी सायंकाळी याच ठिकाणी उतरणार आहे.
Russia's Luna-25 spacecraft has crashed into the moon, reports Germany's DW News citing space corporation Roskosmos pic.twitter.com/ZtxYkFHUp2
— ANI (@ANI) August 20, 2023
नेमकं काय घडलं ?
शनिवारी (19 ऑगस्ट) लूना 25 चंद्राच्या आणखी जवळच्या ऑर्बिटमध्ये नेण्यासाठी प्रयत्न केले जात होते. लँडिंगसाठी ही प्रक्रिया गरजेची होती. मात्र यावेळी लूना 25 च्या लँडरमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या. यामुळे प्रक्रिया काही पूर्ण करता आली नाही. यानंतर पुन्हा प्रयत्न करत असताना लूनाचे लँडर चंद्राच्या अनियोजित कक्षेत पोहोचले. यानंतर लँडरचा ताबा सुटला आणि ते चंद्रावरच कोसळलं.