Download App

Hemant Dhome: जालना लाठीचार्जवर मराठी अभिनेता संतापला; म्हणाला, ‘राजकारणासाठी सारं..’

Jalna Lathi Charge: सध्या जोरदार चर्चा आहे ती म्हणजे जालन्यातील लाठीचार्जची. यमुळे संपूर्ण राजकीय वातावरण पेटल्याचे बघायला मिळत आहे. यावेळी काही मराठी कलाकारांनी यावर प्रतिक्रिया द्यायला आता सुरूवात केली आहे. काल ‘आई कुठे काय करते’ या सिरियलमधील अभिनेत्री अश्विनी महागडे (Ashwini Mahangde) हिनं सोशल मीडियावर (Social media) एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये तिने या प्रकरणावरून जोरदार निषेध व्यक्त केला होता. आता त्यानंतर एका मोठ्या मराठी अभिनेत्यानं एक पोस्ट शेअर केले आहे. त्यात त्याने देखील या घटनेचा जोरदार निषेध व्यक्त केला आहे. अभिनेता, दिग्दर्शक हेमंत ढोमे (Hemant Dhome) यांने देखील यावर आपली खोचक प्रतिक्रिया उमटवली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून जालना येथे शांत मार्गानं सुरू असलेल्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी जोरदार लाठीचार्ज केला होता. याचे पडसाद हे संपुर्ण राज्यभर उमटू लागले होते. यामुळे त्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. यावर विरोधी पक्षनेत्यांनी देखील जोरदार विरोध करण्यात आला होता. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील आंदोलकांची भेट घेतली होती. त्यांच्याबरोबर उदयनराजे भोसले यांनी देखील आंदोलकांच्या भेटी घेतल्याचे बघायला मिळाले आहे.

यामुळे संपूर्ण राज्यभर सरकारनं यावेळी या पोलिसांवर कारवाई केली आहे. पोलिस अधिक्षकांना राज्य सरकारनं सक्तीची रजा देलीचे सांगितले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपल्या भाषणातून आज याची पुष्टी केली होती. अभिनेता-दिग्दर्शक हेमंत ढोमे देखील यावेळी एक पोस्ट शेअर केली आहे. ट्विटरवरून तो म्हणाला आहे की, ”जालन्यामध्ये शांततापूर्ण मार्गाने चालणाऱ्या आंदोलकांवर क्रूर लाठीचार्ज करणाऱ्या सरकारी यंत्रणेचा तीव्र निषेध! दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाई व्हायला हवी! आपल्या राज्यात पुन्हा शांतता प्रस्थापित व्हावी…राजकारणासाठी हे सारं चिघळता कामा नये!”, असं तो यावेळी पोस्टमध्ये सांगितलं आहे आहे. अश्विनी महागडे हिनं ‘मराठा आरक्षण आणि लाठीचार्ज…का? कशासाठी?’ असं लिहित आपली एक इन्टाग्राम स्टोरीवर पोस्ट व्हायरल केली होती.

Maratha Reservation: जालना लाठीचार्ज प्रकरणी ‘या’ मराठी अभिनेत्रीची संतप्त पोस्ट; म्हणाली, “मराठा आरक्षण…”

हेमंत ढोमे हा कायम सामाजिक-राजकीय घटनांवर आपले सडेतोड मत व्यक्त करत असतो. जूलै महिन्यामध्ये अजित पवार गटाच्या बंडावरून त्यानं सोशल मीडियावर आपलं मतं मांडले आहे. यावेळी या घटनेनं राज्यभरातून जोरदार निषेध व्यक्त केला जात आहे. 29 ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्याबरोबर १० जण आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले होते. उपोषणकर्त्यांनी उपचार घ्यावे, यासाठी प्रशासनानं देखील जोरदार प्रयत्न करत आहे. दोन वेळा झालेल्या चर्चेतून देखील काही साध्य झालं नाही. यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचे सांगण्यात येत आहे.

Tags

follow us