Download App

Devara: …म्हणून जान्हवीने देवरा’ची रिलीज डेट पुढे ढकलली, अभिनेत्रीने स्वत:च केला खुलासा

Devara Release Date Postpone: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री जान्हवी कपूरने (Janhvi Kapoor) तिच्या करिअरच्या अल्पावधीतच मोठे नाव कमावले आहे. ती केवळ तिच्या चित्रपटांमुळेच चर्चेत नाही तर तिच्या लुक आणि आउटफिट्समुळेही ती खूप चर्चेत असते. अभिनेत्री सध्या तिच्या आगामी ‘देवरा’ (Devara Movie) या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. यामध्ये ती आरआरआर चित्रपट अभिनेता ज्युनियर एनटीआरसोबत (NTR) रोमान्स करताना दिसणार आहे.

आता या चित्रपटाबद्दल महत्वाची माहिती समोर आली आहे. ही माहिती ऐकून चाहत्यांना थोडा धक्का बसण्याची शक्यता आहे. आता जान्हवीचा हा चित्रपट एप्रिल महिन्यात प्रदर्शित होणार नाही. या चित्रपटाला रिलीजची नवी तारीख मिळाली आहे. साऊथ सिनेसृष्टीतील मोठा सुपरस्टार ज्युनियर एनटीआर याने अलीकडेच सोशल मीडियाच्या (social media) माध्यमातून त्याच्या ‘देवरा’ या चित्रपटाविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. हा चित्रपट यापूर्वी 5 एप्रिल 2024 रोजी प्रदर्शित होणार होता.

मात्र आता या चित्रपटाची रिलीज देत पुढे ढकलण्यात आली आहे. आता हा चित्रपट 10 ऑक्टोबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे प्रदर्शन 4 महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आले आहे. यासोबतच चित्रपटाचे नवे पोस्टरही रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये ज्युनियर एनटीआर फुल ॲक्शन मोडमध्ये दिसत आहे. RRR च्या यशानंतर अभिनेता पुन्हा एक मोठा चित्रपट घेऊन येत आहे.

Priyanka Chopra: कौतुकास्पद! प्रियांका चोप्रा ठरली परफेक्ट मोमेंटमध्ये झळकणारी अभिनेत्री

सैफ अली खानही या चित्रपटाचा महत्वाचा भाग : या चित्रपटातील कलाकारांची बरीच चर्चा झाली होती. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूर व्यतिरिक्त सैफ अली खान देखील दिसणार आहे. गेल्या महिन्यातच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता आणि चाहत्यांना तो खूप आवडला होता. हा चित्रपट समुद्री चाच्यांवर आधारित असून चाहत्यांनी नेहमीच अशा चित्रपटांमध्ये रस दाखवला आहे. अशा परिस्थितीत या चित्रपटाबाबत चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे. मात्र आता हा ॲक्शनपट पाहण्यासाठी चाहत्यांना बरीच प्रतीक्षा करावी लागणार आहे.

follow us

वेब स्टोरीज