Priyanka Chopra: कौतुकास्पद! प्रियांका चोप्रा ठरली परफेक्ट मोमेंटमध्ये झळकणारी अभिनेत्री

Priyanka Chopra: कौतुकास्पद! प्रियांका चोप्रा ठरली परफेक्ट मोमेंटमध्ये झळकणारी अभिनेत्री

Priyanka Chopra Perfect Moment: प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) बॉलिवूडसोबतच (Bollywood) हॉलिवूडमध्येही (Hollywood) विशेष ओळख निर्माण केली आहे. प्रियांकाला ‘ग्लोबल स्टार’, असंही म्हटलं जातं. ‘देसी गर्ल’ (Desi Girl) प्रियांकाने जगभरातील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. प्रियांका ही भारतीय चित्रपटसृष्टीतील एकमेव अभिनेत्री आहे जी 40 हून अधिक आंतरराष्ट्रीय मासिकांवर झळकली आहे. आता प्रियांका चोप्रा जोनास आणि निक जोनास (Nick Jonas) यांनी या ब्रँडचा प्रवास जवळून पाहिला आहे या ब्रँडने म्हणजे “परफेक्ट मोमेंटने” (Perfect Moment) गेल्या आठवड्यात न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये दमदार पदार्पण केल आहे.

प्रियांका आणि निकसाठी परफेक्ट मोमेंट सोबतची त्यांची भागीदारी केवळ आर्थिक फायद्याची ठरली पण सोबतीने या ब्रँडने खूप प्रशंसा मिळवली आहे. परफेक्ट मोमेंट या 2022 पासून लक्झरी आउटडोअर क्लॉथिंग कंपनीचे भाग आहे. परफेक्ट मोमेंट बाजारपेठेत प्रवेश करत असताना प्रियांका आणि निक यांनी ब्रँडच्या भविष्याची अपेक्षा केली. या परिवर्तनाच्या टप्प्यात कंपनीच्या प्रवासाचा भाग असल्याचा त्यांचा अभिमान आणि त्यांच्या सततच्या यशावर त्यांचा विश्वास आहे.

एका इव्हेंट दरम्यान या कपलने परफेक्ट मोमेंटच्या IPO बद्दलचा त्यांचा उत्साह शेअर करत असे म्हटले आहे की ” हा IPO परफेक्ट मोमेंटसाठी एका रोमांचक नवीन प्रवास असणार आहे. प्रवासाच्या या महत्त्वपूर्ण टप्प्यात आम्ही या कुटुंबाचा भाग असल्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. ब्रँडबद्दलची प्रशंसा गेल्या काही वर्षांमध्ये खूप वाढली आहे.

जिंदा दिल अनुपम खेर! डोक्यावर एकही केस नसताना ‘बर्थ डे’ बॉयसाठी खरेदी केला 400 रूपयांचा कंगवा

प्रियांकाचा क्लासी लूक: ब्रिटिश वोगच्या इन्स्टाग्राम पेजवर प्रियांकाचे हटके फोटो पाहायला मिळत आहेत. या फोटोमध्ये प्रियांका क्लासी लूकमध्ये बघायला मिळाली आहे. पिवळ्या कलरचं जॅकेट अन् मोकळे केस अशा हटक्या लूकमध्ये ती दिसत आहे. प्रियांकाच्या या लूकनं चाहत्यांचाचे लक्ष वेधले आहे. तसेच ब्रिटिश वोगच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आलेल्या एका फोटोमध्ये प्रियांका ही तिच्या मुलीसोबत पोज देताना पाहायला मिळाली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube