Hollywood Strike: हॉलिवूडला लागला ब्रेक! अॅक्टर्स अन् रायटर्सचा संप; नेमक्या काय आहेत मागण्या?
Hollywood Strike : हॉलिवूड (hollywood) कलाकारांनी गुरुवारी संप केल्याचे समोर आले आहे. त्यांनी काल १३ जुलै दिवशी याविषयी माहिती दिली की १४ जुलै म्हणजे ते आजपासून संप पुकारणार आहेत. (Hollywood Strike) कलाकारांनी हा संप त्यांच्यासाठी नाही तर सिनेमासृष्टीतील अॅक्टर्स अन् रायटर्स यांनी केला आहे. (Tom Cruise) त्यामध्ये ६३ वर्षांनंतर पहिल्यांदा असा मोठा संप पुकारण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.
Hollywood actors join writers to strike for fairness. First time in 63 years #Strike #HollywoodStrike #Hollywood pic.twitter.com/wSxSlYGNPI
— RogNuckStri𝕏 (@RogNuck) July 14, 2023
गेल्या ३ महिन्यांपूर्वी कमी वेतन आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे निर्माण झालेल्या धोक्यामुळे रायटर्सनी काम करणं बंद केलं होतं. (Johnny Depp) आता त्यांच्या संपामध्ये अनेक सिनेमे आणि टेलिव्हिजन अॅक्टर्स देखील सहभागी झाले आहेत. द स्क्रीन अॅक्टर्स गिल्ड (एसएजी-एएफटीआरए) मधील ए-लिस्ट अॅक्टर्ससह १ लाख ६० हजार अॅक्टर्स रायटर्सना पाठिंबा दर्शविला आहे. हा संप काल मध्यरात्रीपासून सुरु झाला आहे. त्यांनी हा संप ही कमी वेतन आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे निर्माण झालेल्या धोक्याला पाहता करण्यात आला आहे.
नेमकं स्ट्रीमिंगची वाढती मागणी आणि कोरोनामुळे उद्भवलेल्या अडचणी यामुळे स्टुडियोवर नेमका काय परिणाम झाला, त्यापैकी कोणाला पैशांचा नेमका प्रॉब्लेम निर्माण झाले आहे. त्यासोबतच अॅक्टर्स आणि रायटर्सचा एकदम अचानक आणि पटकन बदलत आहेत. यामुळे ते चांगलं मानधन आणि त्यांना प्रोजेक्टमधून काढू टाकणार नाही, ही सिक्योरिटी हवी यासाठी हा संप करत असल्याचे समोर आहेत. ए-लिस्ट कलाकारांनी गेल्या महिन्यात गिल्ड लीडरशिपवर एका पत्रावर साइन कारणात आले आहे, आणि ते म्हणाले आहेत की, ते संपावर जाण्यास तयार आहेत. त्यांनी या घटनेला बदल करण्याची वेळ असल्याचे यावेळी सांगितले आहे.
आपल्याच मुलीला रीना दत्ता म्हणाली, ‘…तर तू जिवंत राहायची नाहीस’; आमिरच्या मुलीवर ही वेळ का आली?
कलाकार संपात सहभागी झाल्याने अमेरिकेमध्ये सर्व सिनेमा आणि स्क्रिप्टेड टेलिव्हिजन शोची निर्मिती थांबण्यात आली आहे. ज्यांचे स्वतंत्र प्रॉडक्शन आहेत आणि जे युनीयन लेबर अॅग्रीमेंटमध्ये समाविष्ट नाहीत, त्यांचं काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या संपामुळे ‘स्ट्रेंजर थिंग्ज’, ‘द हँडमेड्स टेल’ सारख्या लोकप्रिय सिरियलची देखील शुटिंग थांबल्याचे सांगितले जात आहे. संप असाच सुरू राहिल्यास अनेक सिनेमांना मोठा फटका बसणार आहे. तसेच काही सिनेमे देखील पुढे ढकलले जाऊ शकणार आहेत. तर गुरुवारी मध्यरात्री सुरु झालेल्या या संपाविषयी बोलायचे झाले तर कलाकार १९६० नंतर पहिल्यांदा हॉलिवूड ‘डबल स्ट्राइक’ मध्ये रायटर्ससोबत संपात सहभाग झाल्याचे दिसत आहेत.