Javed Akhtar: देशभरातील सर्वोत्कृष्ट सिनेमा मराठवाड्यातील प्रेक्षकांनापर्यंत पोहोचवणाऱ्या नवव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (International Film Festivel ) घोषणा करण्यात आली असून बुधवार (03 ते 07 जानेवारी 2024) या कालावधीमध्ये पार पडणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या मांदियाळीत संपन्न होणार आहे. या महोत्सवात भारतीय सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाविषयी दिला जाणारा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार सुप्रसिध्द गीतकार आणि लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांना जाहीर करण्यात आल्याची घोषणा महोत्सवाचे संस्थापक आणि संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल आणि प्रमुख मार्गदर्शक अंकुशराव कदम यांनी केली आहे.
पद्मपाणी पुरस्कार निवड समितीने श्रीयुत अख्तर यांच्या नावाची निवड करण्यात आली आहे. या समितीमध्ये प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली, बेंगळुरू, ज्येष्ठ समीक्षक लतिका पाडगांवकर (मुंबई), प्रसिद्ध हिंदी कवी अशोक बाजपेयी (दिल्ली), फेस्टीव्हल डायरेक्टर अशोक राणे, प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी हजेरी लावली होती. पुरस्काराचे स्वरूप पद्मपाणी सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि दोन लक्ष रुपये देण्यात येणार आहे.
पद्मपाणी जीवनगौरव पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात 3 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता रुक्मिणी सभागृह, एमजीएम परिसर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी होणार आहे. तर महोत्सव पुढील 5 दिवस आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे पार पडणार आहे.
Ajinkya Nanavare: नाटकानंतर ‘सोंग्या’ मधून अजिंक्य ननावरे लक्षवेधी भूमिकेत
कोण आहेत जावेद अख्तर
सुप्रसिद्ध गीतकार, कवि जावेद अख्तर हे आजच्या पिढीलाही आपलेसे वाटत आहेत. जावेद अख्तर त्यांनी त्यांच्या काव्यातील तारुण्य आजही जपलेलं आहे. सोबतच जावेद अख्तर त्यांच्या निर्भीड स्वभावासाठी आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. आता नुकतंच ‘नेपोटीजम’विषयी केलेल्या वक्तव्यामुळे जावेद अख्तर पुन्हा चर्चेत आले होते.