Jawan: जवान चित्रपटाचे नवीन पोस्टर, किंग खानचा गनसोबत कूल लूक

Jawan Look Out: शाहरुख खान (Shah Rukh Khan) म्हणजेच चाहत्यांचा लाडका किंग खानच्या (King Khan) मोस्ट अवेटेड ‘जवान’ (Jawan) या सिनेमाचा प्रिव्हू नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. ज्याला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले आहे. आता पुन्हा एकदा किंग खानच्या ‘जवान’ सिनेमातील त्याचा आणखी एक लूक (Badass look) चाहत्यांना उघड करून किंग खानने सर्वांचं आश्चर्यचकित केले आहे. […]

Jawan

Jawan

Jawan Look Out: शाहरुख खान (Shah Rukh Khan) म्हणजेच चाहत्यांचा लाडका किंग खानच्या (King Khan) मोस्ट अवेटेड ‘जवान’ (Jawan) या सिनेमाचा प्रिव्हू नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. ज्याला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले आहे. आता पुन्हा एकदा किंग खानच्या ‘जवान’ सिनेमातील त्याचा आणखी एक लूक (Badass look) चाहत्यांना उघड करून किंग खानने सर्वांचं आश्चर्यचकित केले आहे.


किंग खानने त्याच्या सोशल मीडियावर सिनेमाचे आणखी एक पोस्टर रिलीज केले आहे. यामध्ये किंग खान हा हातात पिस्तुल आणि डोळ्यावर काळ्या चष्मा असलेल्या ब्लेड लूकमध्ये पूर्ण स्वॅग आणि अॅटिट्यूडमध्ये असल्याचे दिसून येत आहे. पोस्टरबरोबर किंग खानने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘जेव्हा मी खलनायक बनतो, तेव्हा माझ्यासमोर कोणताही नायक टिकू शकत नाही.

तसेच ‘जवान’ सिनेमाच्या ट्रेलरला फक्त २४ तासांमध्ये तब्बल ११२ मिलियन व्ह्यूज मिळाले होते. किंग खानच्या ‘रेड चिलीज एंटरटेनमेंट’ याबाबत एक ट्वीटही केले होते. याअगोदर किंग खानच्या ‘पठाण’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’ सिनेमाद्वारे किंग खानने तब्बल ४ वर्षांनी बॉलीवूडमध्ये पुनरागमन केले होते.

‘पठाण’ सिनेमापासूनच किंग खानच्या ‘जवान’ची चर्चा सुरु झाली होती. दरम्यान, ‘जवान’ सिनेमात किंग खानसोबत नयनतारा आणि विजय सेतुपती यांचीही प्रमुख भूमिका आहे. तसेच दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा, प्रियमणी, गिरिजा ओक, संजिता भट्टाचार्य, लहर खान, आलिया कुरेशी, रिद्धी डोंगरा, सुनील ग्रोव्हर आणि मुकेश छाबरा हे कलाकार सुद्धा सिनेमात महत्त्वाच्या भूमिका साकारत असल्याचे दिसणार आहे.

आपल्याच मुलीला रीना दत्ता म्हणाली, ‘…तर तू जिवंत राहायची नाहीस’; आमिरच्या मुलीवर ही वेळ का आली?

Exit mobile version