Download App

Jawan Box Office Collection: किंग खानच्या ‘जवान’ने विक्रम रचला! अवघ्या दोन दिवसांत केली ‘इतकी’ कमाई

Box Office Collection: तब्बल ४ वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर धमाकेदार पुनरागमन करत किंग खानने ‘पठान’मधून आपला जलवा दाखवला होता. (Jawan Box Office ) आता पुन्हा एकदा किंग खान एका नवीन अवतारामध्ये रुपेरी पडद्यावर बघायला मिळाला आहे. (Box Office Collection) एवढेच नाही तर, त्याने अनेक रेकॉर्ड केले आहे. (Shah Rukh Khan) ‘पठान’ नंतर ‘जवान’ सध्या बॉक्स ऑफिसवर एक अनोखा इतिहास रचला आहे. ‘जवान’ हा सिनेमा अनेक विक्रम नोंदवेल आणि अनेक सिनेमाचे रेकॉर्ड मोडेल, असे सांगितले जात आहे.


‘जवान’ने प्रदर्शित होताच ७५ कोटींचा गल्ला कमावला आहे. त्यानंतर हा सिनेमा बॉलिवूडचा सर्वात मोठा ओपनिंग करणारा सिनेमा ठरला आहे. तसेच सिनेमाने दुसऱ्या दिवशी देखील १०० कोटींचा टप्पा गाठला आहे. आजपर्यंत एकाही सिनेमाला ही किमया जमली नव्हती. सनी पाजीच्या ‘गदर २’ ला १०० कोटींचा टप्पा पार करायला ३ दिवस लागले होते. परंतु ‘पठाण’ने २ दिवसांतच १०० कोटींचा गल्ला कमावला आहे. अशा परिस्थितीमध्ये आता किंग खानच्या ‘जवान’ची जादू बॉक्स ऑफिसवर देखील जोरदार धुमाकूळ घालत आहे.

‘जवान’ सिनेमाने प्रदर्शितच्या दुसऱ्या दिवशी देखील ५३ कोटींची कमाई करून एक अनोखा केला आहे. त्यानंतर सिनेमाचे एकूण कलेक्शन १२७.५० कोटी झाले. आता ‘जवान’ वीकेंडला नेमकी किती कमाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा सिनेमा हिंदी, तमिळ आणि तेलुगू या तीन भाषेत प्रदर्शित करण्यात आला आहे. यानुसार ‘जवान’च्या हिंदी आवृत्तीने कमाईचा जबरदस्त आकडा पार केल्याचे देखील सांगितले जात आहे.

बर्लिन चित्रपट महोत्सवात निवड झालेला ‘आत्मपॅम्फ्लेट’ 6 ऑक्टोबरला चित्रपटगृहात!

तसेच ‘जवान’ सध्या कमाईचे झेंडे फडकावत आहेत. तर, दुसरीकडे किंग खान देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत त्याच्या चाहत्यांशी कनेक्ट राहिला आहे. किंग खानने या उदंड प्रतिसादासाठी चाहत्यांचे आभार देखील मानले आहे. ‘जवान’ला दोन दिवसामध्ये मिळालेले यश बघून किंग खानने त्याच्या चाहत्यांचे आभार मानणारी एक पोस्ट देखील शेअर केली आहे. जी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या सिनेमात अभिनेता किंग खानसोबत अभिनेत्री नयनतारा मुख्य भूमिकेमध्ये बघायला मिळत आहे. तर, साऊथ स्टार विजय सेतुपती देखील दमदार भूमिकेत दिसत आहे.

 

Tags

follow us