बर्लिन चित्रपट महोत्सवात निवड झालेला ‘आत्मपॅम्फ्लेट’ 6 ऑक्टोबरला चित्रपटगृहात!

बर्लिन चित्रपट महोत्सवात निवड झालेला ‘आत्मपॅम्फ्लेट’ 6 ऑक्टोबरला चित्रपटगृहात!

किशोरवयीन प्रेमाची कथा सांगणारा चित्रपट ‘आत्मपॅम्प्लेट’ हा येत्या 6 ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘आत्मपॅम्प्लेट’ चित्रपटाची बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झाली, तेव्हापासूनच या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. अखेर आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित करण्यात आली असून 6 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांना चित्रपटगृहात हा चित्रपट पाहता येणार आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते परेश मोकाशी यांनी या चित्रपटाच्या कथेचं लिखाण केलं असून आशिष बेंडे यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. वाळवी चित्रपटाच्या लिखाणानंतर परेश मोकाशी आणखी एक नवीन लिखाणाचा हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘आत्मपॅम्फ्लेट’ हा चित्रपट झी स्टुडिओज, आनंद एल. राय, भूषण कुमार या तिघांनाही एकत्र आणणारा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे.

Rahul Gandhi पुन्हा परदेशातून बरसले; म्हणाले, देशातील प्रश्नांवरील लक्ष हटवण्यासाठी इंडिया आणि भारतचा मुद्दा

‘आत्मपॅम्फ्लेट’ या चित्रपटात ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत भीमराव मुडे आणि केतकी सराफ यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाला वेगळं नाव देण्यात आलं असून चित्रपटात नेमकं काय आहे? याचं उत्तर प्रेक्षकांनी येत्या 6 ऑक्टोबरला चित्रपटगृहात चित्रपट पाहिल्यानंतरच मिळणार आहे. चित्रपटाला वेगळं नाव देण्यात आल्याने आता हा चित्रपट पाहण्याची आणखीनच उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढत असल्याचं दिसून येत आहे.

Airhostess रुपलची हत्या करणाऱ्या संशयिताची तुरुंगातच आत्महत्या; पॅन्टच्या सहाय्याने गळफास

दरम्यान, चित्रपटाचे गुलशन कुमार, टी सिरीज फिल्म्स, कलर यल्लो प्रोडक्शन्स आणि झी स्टुडिओज प्रस्तुत, मयसभा करमणूक मंडळी निर्मित ‘आत्मपॅम्फ्लेट’चे भूषण कुमार, क्रिशन कुमार, आनंद एल. राय, कनुप्रिया ए. अय्यर, मधुगंधा कुलकर्णी आणि झी स्टुडिओज हे निर्माते आहेत.

73 व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘जनरेशन 14 प्लस’ स्पर्धा प्रकारामध्ये ‘आत्मपॅम्फ्लेट’ चित्रपटाची निवड झाली, त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखल्या जाणाऱ्या चित्रपटांच्या यादीत झी स्टुडिओजने आणखी एका नव्या चित्रपटाची भर घातल्याचं बोललं जातं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube