Airhostess रुपलची हत्या करणाऱ्या संशयिताची तुरुंगातच आत्महत्या; पॅन्टच्या सहाय्याने गळफास

Airhostess रुपलची हत्या करणाऱ्या संशयिताची तुरुंगातच आत्महत्या; पॅन्टच्या सहाय्याने गळफास

मुंबई : येथील एअर हॉस्टेस रुपल ओगरे (23) (Rupal Ogrey Murder) हिची हत्या करणारा संशयित आरोपी विक्रम अटवाल याने तुरुंगातच आत्महत्या केली आहे. आज (8 सप्टेंबर) अंधेरी पोलिस स्टेशनच्या तुरुंगातच पॅन्टच्या सहाय्याने गळफास घेत त्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. (Air hostess Rupal Ogrey Murder suspect Vikram Atwal has committed suicide in jail)

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईत एका विमान कंपनीत एअर होस्टेस म्हणून काम करणाऱ्या रुपल ओगरे (मूळ रा. रायपूर, छत्तीसगड) हिचा मरोळमधील एनजी कॉम्प्लेक्समधील 4 सप्टेंबर रोजी राहत्या घरी मृतदेह आढळून आला होता. गळा चिरलेल्या अवस्थेत आणि रक्ताच्या थारोळ्यात तिचा मृतदेह आढळून आल्याने तिची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले होते.

वडिलांच्या निधनानंतर चौथ्या दिवशीच गौतमी पाटील पुन्हा मंचावर; पहिल्यांदाच मुंबईत कार्यक्रम

याप्रकरणी सीसीटीव्हाच्या आधारे पोलिसांनी तिच्या घरी सफाई काम करणाऱ्या विक्रम अटवाल याला अटक केली होती. रुपल ओगरे तिची बहीण आणि मित्रासोबत मरोळमधील एनजी कॉम्प्लेक्समध्ये राहत होती. मात्र दोघेही कामानिमित्त बाहेर असतानाच रविवारी दुपारच्या सुमारास तिची हत्या झाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रुपलने विक्रम आटवाल याला इमारतीत सफाईचं काम करणासाठी घरी बोलावले होते. त्यावेळी रुपल घरात एकटीच होती. ही संधी साधून विक्रमने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. मात्र रुपलने विरोध केल्यानंतर विक्रम अटवाल याने तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.

कोरोना गेला आता झिकाची धास्ती! मुंबईत झिकाबाधित दुसरा रुग्ण आढळला…

पण रुपलने विरोध करताच आटवालने चाकून तिच्यावर वार करत तिची हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं होतं. दरम्यान, विक्रमला न्यायालयाने पोलीस कोठडीत पाठविले होते. पण आज सकाळी त्याने तुरुंंगात असतानाच पॅन्टच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे वृत्त आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube