Download App

‘King Khanच्या ‘जवान’ सिनेमातील विजयचा डॅशिंग लूक आऊट! फोटो पाहून चाहते म्हणाले…

Jawan New Poster : बॉलिवूडचा बादशाह किंग खान (King Khan) म्हणजेच चाहत्यांचा लाडका शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘जवान’ (Jawan) या सिनेमाची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागल्याचे दिसून येत आहे. एटली दिग्दर्शित या सिनेमाचं सध्या जोरदार प्रमोशन असल्याचे पाहायला मिळत आहे. या सिनेमात किंग खानच्या लूकचं मोठ्या प्रमाणात कौतुक होत असल्याचे बघायला मिळत आहे.

दरम्यान या सिनेमात विजय सेतुपतीचा (Vijay Sethupathi) लूक आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असल्याचे दिसून येत आहे. ‘जवान’ सिनेमातील विजय सेतुपतीचा पहिला लूक समोर आल्याचे दिसत आहे. यामुळे चाहत्यांची सिनेमाबद्दलची मोठी उत्सुकता आणखी वाढली असल्याचे दिसत आहे. ‘जवान’ या सिनेमाच्या माध्यमातून विजय सेतुपती पहिल्यांदा शाहरुख खानबरोबर स्क्रीन शेअर करत असल्याचे दिसून येणार आहे.


किंग खानने ‘जवान’ सिनेमातील विजय सेतुपतीच्या हटके लूकचं पोस्टर शेअर करण्यात आले आहे. पोस्टर शेअर करत असताना त्यानी सांगितले आहे की,”त्याला कोणी थांबवत नाही…. किंग खानच्या या पोस्टरवर चाहत्यांनी देखील मोठ्या प्रमाणात कमेंट्सचा वर्षाव करत असल्याचे दिसून येत आहे. चाहते या सिनेमासाठी खूप वाट पाहात असल्याचे दिसून येत आहेत. विजय सेतुपतीच्या या पोस्टरवर ‘मृत्यूचा व्यापारी’ असे लिहिले असल्याचे दिसून येत आहे.

किंग खानचा ‘जवान’ हा सिनेमा ७ सप्टेंबर २०२३ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. किंग खानसह या सिनेमात नयनतारा (Nayanthara), प्रियामणी (Priyamani), विजय सेतुपती हे कलाकार मुख्य भूमिकेमध्ये दिसून येणार आहेत. तर बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणची हटके झलक या सिनेमात बघायला मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक (Girija Oak) या सिनेमात मुख्य भूमिकेमध्ये चाहत्यांचे मनोरंजन करणार आहे.

ज्येष्ठ अभिनेते Dr. Mohan Agashe यांचा ‘पुण्यभूषण’ पुरस्काराने सन्मान! अनुपम खेर पोस्ट करत म्हणाले…

किंग खानचा ‘पठाण’ (Pathaan) हा सिनेमा गेल्या काही दिवसाअगोदर चाहत्यांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केल्याचे दिसून आले आहे. जगभरात या सिनेमाने १ हजार कोटींचा टप्पा पार केला होता. आता किंग खान ‘जवान’ (Jawan) हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीसाठी सज्ज होणार आहे.

Tags

follow us