जया बच्चन यांच्या आईच्या निधनाची बातमी खोटी; इंदिरा भादुरी यांच्या पाठीचा कणा मोडल्याने रुग्णालयात दाखल

Jaya Bachchan Mother Death : बॉलिवूड अभिनेत्री आणि राज्यसभा खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) यांच्या आई आणि अमिताभ बच्चन यांच्या सासू इंदिरा भादुरी यांच्या निधनाचं वृत्त खोटं आहे. पाठीचा कणा मोडल्यामुळे त्यांना भोपाळमधील रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (Jaya Bachchan’s mother Indira Bhaduri passes away in Bhopal) जया बच्चन यांच्या आई इंदिरा […]

Letsupp Image (59)

Letsupp Image (59)

Jaya Bachchan Mother Death : बॉलिवूड अभिनेत्री आणि राज्यसभा खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) यांच्या आई आणि अमिताभ बच्चन यांच्या सासू इंदिरा भादुरी यांच्या निधनाचं वृत्त खोटं आहे. पाठीचा कणा मोडल्यामुळे त्यांना भोपाळमधील रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (Jaya Bachchan’s mother Indira Bhaduri passes away in Bhopal)

जया बच्चन यांच्या आई इंदिरा भादुरी यांच्या निधनाची बातमी खोटी आहे. त्यांच्या आई सध्या रुग्णालयात दाखल आहे. इंदिरा भादुरी यांच्या पाठीचा कणा मोडला होता, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. जया बच्चन यांच्या आईचे निधन झाल्याचा दावा अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. मात्र, या बातम्या खोट्या असल्याचे सिद्ध झालंय.

‘पौर्णिमेचा फेरा’ हॉरर कॉमेडी वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला, ‘या’ युट्युब चॅनेलवर पाहता येणार

जया बच्चन यांच्या आई इंदिरा भादुरी यांच्या केअरटेकर एबीपी न्यूजशी बोलताना म्हणाली, की इंदिरा भादुरी यांची प्रकृती पुर्णपणे स्थिर आहे. केवळ त्यांच्या पाठीचा कणा फ्रॅक्चर झालाय. इंदिरा भादुरी यांच्या केअरटेकरच्या म्हणण्यानुसार, त्यांना सध्या कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसून त्या आता आराम करत आहेत. जया भादुरी यांच्या मणक्याला किरकोळ फ्रॅक्चर झाला असून त्या हॉस्पिटलमध्ये आहेत.

अभिनेता अंकित मोहन म्हणतोय ‘झालोया मी पैलवान…’; बिग हिट मीडिया प्रस्तुत ‘पैलवान’ गाणं प्रदर्शित!

जया बच्चन यांच्या आई इंदिरा भादुरी यांच्यावर गेल्या वर्षी शस्त्रक्रिया झाली होती. हृदयाशी संबंधित समस्यांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, इंदिरा भादुरी यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेथे त्यांच्यावर पेसमेकर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पेसमेकर शस्त्रक्रियेमध्ये, कॉलरबोनच्या अगदी खाली छातीत पेसमेकर लावला जातो. त्यात बॅटरी, सर्किटरी आणि एक ते तीन विद्युत तारा असतात. पेसमेकर हृदयाच्या ठोक्यांवर लक्ष ठेवतो आणि ते मंद असल्यास त्याचा वेग वाढवतो. जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्या सासू इंदिरा भादुरी या भोपाळच्या श्यामला हिल्समधील अंसल अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांचे पती तरुण भादुरी हे अनेक वृत्तपत्रांमध्ये काम करणारे पत्रकार होते. ते उत्तम लेखकही होते. तरुण भादुरी यांनी 1996 मध्येच जगाचा निरोप घेतला होता. त्यानंतर इंदिरा भादुरी एकट्या राहत आहेत.

 

 

Exit mobile version