Jaya Bachchan संतापल्या.. उपराष्ट्रपतींना राज्यसभेत दाखवले बोट; जाणून घ्या, महाराष्ट्राचं कनेक्शन !

Jaya Bachchan संतापल्या.. उपराष्ट्रपतींना राज्यसभेत दाखवले बोट; जाणून घ्या, महाराष्ट्राचं कनेक्शन !

मुंबई – समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) यांचा राज्यसभेतील एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ 9 फेब्रुवारीचा आहे. या व्हिडिओत जया बच्चन या सभापती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांच्याकडे बोट दाखवत काहीतरी बोलत असल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत.

आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून लोक जया बच्चन यांना ट्रोल करत आहेत. त्याचवेळी भाजपनेही (BJP) हा व्हिडिओ शेअर करून समाजवादी पक्षावर (Samajwadi Party) निशाणा साधला आहे. दुसरीकडे, समाजवादी पार्टीचे म्हणणे आहे की, जया बच्चन यांचा राग हा संपूर्ण देशाचा राग आहे.

नेत्यांसोबतच इतर युजर्सही व्हिडिओ शेअर करत आहेत. जया बच्चन यांना ट्रोल करत भाजपा प्रवक्ते अजय सेहरावत यांनी म्हटले, की राज्यसभेच्या खासदार यांची ही वर्तणूक अत्यंत दुर्दैवी आहे. भाजप नेते लक्ष्मीकांत भारद्वाज यांनी या प्रसंगाचा फोटो शेअर करत म्हटले, की अहंकारी जया बच्चन राज्यसभेत उपराष्ट्रपतींना बोट दाखवत आहेत. लोकशाहीच्या मंदीरात असे लोक येतात तरी कसे.

या प्रकारावर समाजवादी पार्टीचे प्रवक्ते अमीक जामेई म्हणाले, की “अदानींच्या देशाच्या लूटमारीच्या विरोधात समाजवाद्यांनी लखनौपासून नवी दिल्लीपर्यंत ज्या प्रकारे आवाज उठवला त्यामुळे केंद्र सरकार अस्वस्थ झाले. जयाजींचा राग हा देशाचा राग आहे. उपराष्ट्रपती विरोधकांना विश्वासात घेऊ शकले नाहीत.

नेमका काय आहे प्रकार ?

९ फेब्रुवारीला अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणावरील चर्चेदरम्यान राज्यसभेत गदारोळ झाला. काँग्रेसच्या (Congress) महाराष्ट्रातील बीडच्या खासदार रजनी पाटील यांना सध्याच्या अधिवेशनाच्या उर्वरित दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणावर सपा खासदार जया बच्चन यांनी विरोध करत काँग्रेस खासदाराला पाठिंबा दिला. रजनी यांना बोलण्याची संधी देण्यात आली नाही, असे सपा खासदार म्हणाले. दरम्यान, गोंधळातच जया सभापतींकडे बोट दाखवत निघाल्या होत्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube