Download App

Trial Period च्या यशानंतर जेनेलिया अन् मानवकडून आलिया सेनचं कौतुक

Trial Period : अभिनेत्री जेनेलिया देशमुख आणि मानव कौल यांचा ट्रायल पिरीयड हा चित्रपट नुकताच रिलीज झाला. त्याचं दिग्दर्शन आलिया सेन यांनी केलं आहे. या चित्रपटाच्या यशानंतर चित्रपट समिक्षकांसह प्रेक्षकांकडून आलियाचं कौतुक केलं जात आहे. हा चित्रपटात भाड्याने वडिल आणणे या संकल्पनेवर आधारित आहे. त्यानंतर आता चित्रपटाची अभिनेत्री जेनेलिया आणि मानवने देखील आलियाचं कौतुक केलं आहे. ( Jenelia and Manav Kaul appreciation director Aleya Sen after Trial Period )

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं चर्चेतलं विधान! ‘शरद पवार म्हणजे जपानी गुडीयाचं’…

यावेळी मानव कौल म्हणाला की, आलियाचं तिच्या कैशल्यांवर पूर्ण प्रभुत्व असतं. पण ती मला माझ्या आयडिया आणि सुधारणा करण्यासाठी देखील ती परवानगी देत होती. त्यामुळे तिच्याकडे अभिनेत्यांना सहकार्य करणे, उद्देश्य स्पष्ट असणारी तसेच एक क्षमता असणारी तिच्याकडे आहे. त्यामुळे तिच्यासोबत काम करताना आनंद मिळतो. तिचं काम चित्रपटातील प्रत्येक सीनमधून चमकत आहे.

एफआयआर दाखल केला तर तपशील काय? सुप्रीम कोर्टाने फटकारले

तर आलियाचं कौतुक करताना जेनेलिया म्हणाली की, आलिया अत्यंत पॅशनेट डायरेक्टर आहे. कामा अधी ती काळजीपूर्वक अभ्यास करते. ती जेव्हा सेटवर येते तेव्हा ती प्रत्येकाकाडून चांगल्या कामाची आपेक्षा करते. पोशाखापासून प्रत्येक गोष्टीमध्ये ती स्वतः लक्ष देते. तसेच एक स्त्री असल्याने ती प्रत्येक बारकावे काळजीपूर्वक पाहते.

कपडे खरेदी करत असताना अनेकदा तुम्ही कपड्यांचा ट्रायल घेत असाल. ट्रायल घेणे म्हणजे कोणतीही वस्तू खरेदी करण्याच्या अगोदर ती वापरुप बघणे. परंतु बाबांना ट्रायलवर घेतलं आहे, असं कधी तुम्ही कोणाकडून ऐकलं आहे का? अभिनेत्री जिनिलिया देशमुख (Genelia Dsouza) आणि अभिनेता मानव कौल (Manav Kaul) यांचा ट्रायल पीरियड हा सिनेमा नुकताच आला.

या सिनेमात ३० दिवस ट्रायल पीरियडवर घेण्यात आलेल्या वडिलांची गोष्ट दाखवण्यात आली आहे. जिनिलिया डिसूजा आणि मानव कौल यांच्यासोबतच शक्ति कपूर, शीबा चड्ढा, गजराज राव हे कॉमेडी कलाकार देखील या सिनेमात प्रमुख भूमिकेमध्ये आहेत. या सिनेमात जिनिलिया ही एका सिंगल मदरची भूमिका साकारली आहे, तर मानव हा ट्रायल फादरची भूमिका साकारली आहे. या सिनेमाची चाहत्यांनी देखील प्रसंशा केली आहे.

Tags

follow us