Jhimma 2: ‘झिम्मा 2’ची ग्रँड ओपनिंग! पहिल्याच दिवशी केली कोटींची कमाई

Jhimaa 2 Box Office Collection : कोरोनानंतर प्रदर्शित होणारा पहिला मराठी सिनेमा म्हणून ‘झिम्मा’ या चित्रपटाकडे बघितलं जातं. हिंदीचे काही चित्रपट कोरोनानंतर रिलीज करण्यासाठी निर्माते घाबरत होते. त्यावेळी ‘झिम्मा’ हा सिनेमा प्रदर्शित करण्याचं धाडस मराठी मनोरंजनसृष्टीने केलं होते. ‘झिम्मा’ (Jhimaa) या चित्रपटाचा सर्वत्र बोलबाला बघायला मिळाला, आणि चित्रपट त्यावेळी फक्त प्रदर्शित झाला नाही तर या […]

Jhimma 2 : सप्तरंगांची उधळण करणारा ‘झिम्मा 2’ चा धमाकेदार ट्रेलर ‘या’ दिवशी होणार रिलीज

Jhimma 2 : सप्तरंगांची उधळण करणारा ‘झिम्मा 2’ चा धमाकेदार ट्रेलर ‘या’ दिवशी होणार रिलीज

Jhimaa 2 Box Office Collection : कोरोनानंतर प्रदर्शित होणारा पहिला मराठी सिनेमा म्हणून ‘झिम्मा’ या चित्रपटाकडे बघितलं जातं. हिंदीचे काही चित्रपट कोरोनानंतर रिलीज करण्यासाठी निर्माते घाबरत होते. त्यावेळी ‘झिम्मा’ हा सिनेमा प्रदर्शित करण्याचं धाडस मराठी मनोरंजनसृष्टीने केलं होते. ‘झिम्मा’ (Jhimaa) या चित्रपटाचा सर्वत्र बोलबाला बघायला मिळाला, आणि चित्रपट त्यावेळी फक्त प्रदर्शित झाला नाही तर या चित्रपटाने चाहत्यांची मनं जिंकण्यासोबत बॉक्स ऑफिस जोरदार कामे केली. ‘झिम्मा’नंतर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची अर्थात ‘झिम्मा 2’ची (Jhimaa 2) चाहते मोठ्या आतुरतेने वाट बघत होते. अखेर 24 नोव्हेंबर 2023 दिवशी हा बहुप्रतिक्षित चित्रपट चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला.


‘झिम्मा’, ‘बाईपण भारी देवा’ हे महिलांवर आधारित असलेले चित्रपट गेल्या काही दिवसांत चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. या सिनेमांनी महिलावर्गाचं मनोरंजन करण्यासोबत पुरुषमंडळींना आरसा दाखवण्याचं काम केलं आहे. संपूर्ण कुटुंबियांनी एकत्र सिनेमागृहामध्ये जाऊन या चित्रपटाचा आस्वाद घेतला आहे. त्यानंतर ‘झिम्मा 2’ची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळत होती. आता हा बहुचर्चित चित्रपट चाहत्यांच्या भेटीला आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तगडी स्टारकास्ट, उत्तम कथानक, उत्कृष्ट दिग्दर्शन असं सर्व कमाल असणाऱ्या या चित्रपटाने प्रदर्शनच्या पहिल्या दिवशी 1.20 कोटींचा गल्ला कमावला आहे.

‘झिम्मा 2′ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा हेमंत ढोमेने सांभाळली आहे. तर इरावती कर्णिकने या चित्रपटाचं लेखन केलं आहे. तसेच सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे, सिद्धार्थ चांदेकर, अनंत जोग या अशी या चित्रपटाची स्टारकास्ट मुख्य भूमिकेत दिसत आहे.

‘झिम्मा’ मधील या सात मैत्रिणींना चाहत्यांनी खूप प्रेम दिलं आहे. आणि बॉक्स ऑफिसवर सुपरहिटची मोहर उमटवली. स्त्रियांना त्यांच्या अंतरंगाचा शोध या निमित्ताने घेता आल्याचे बघायला मिळत आहे. आयुष्यामध्ये स्वतःसाठी काही क्षण देणे, किती आवश्यक आहे, याची जाणीव ‘झिम्मा’ने करून दाखवली आहे. हेच ‘स्वत्त्व’ शोधायला लावणारा हा चित्रपट पुन्हा जोमाने आपल्या मैत्रिणींच्या भेटीला आला आहे. धमाल, मस्ती आणि मनोरंजनाचा फंडा नव्याने अनुभवायला आणि जगणं नव्याने एन्जॉय करायला शिकवणारा हा चित्रपट आहे.

‘अरुंधतीने गायलेल्या गाण्याची झलक अन् बरच काही… ‘होऊ दे धिंगाणा 2’ चा धमाकेदार प्रोमो व्हायरल

‘झिम्मा’मधून या मैत्रिणी चाहत्यांच्या भेटीला आल्या आहेत. आता ‘झिम्मा 2’मधून या मैत्रिणींना पुन्हा भेटण्याची संधी चाहत्यांना मिळाली आहे. त्यात या ताफ्यात आता आणखी दोन मैत्रिणी सामील झाल्या आहेत. यामुळे आता धमालही डबल वाढल्याचे दिसणार आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाला सिनेरसिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. आता वीकेंडला हा सिनेमा आणखी मोठ्या प्रमाणात गल्ला करू शकणार आहे.

Exit mobile version