Jimmy Sheirgill : ‘प्यादे’ची उत्सुकता आता आणखी शिगेला पोहोचली आहे. नुकताच मुंबईत एका खास सोहळ्यात या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. शायनिंग मून पिक्चर्स प्रस्तुत या सोहळ्याला चित्रपटाचे मुख्य कलाकार जिमी शेरगिल आणि प्रनूतन बहल यांच्यासह लेखक-दिग्दर्शक शेखर एस. झा आणि निर्माते रिंकू सिंह उपस्थित होते. संपूर्ण टीमने एकत्र येत चित्रपटाचा आनंद साजरा केला आणि प्रेक्षकांना या चित्रपटात काय पाहायला मिळणार आहे, याची छोटीशी झलक दाखवली. ‘प्यादे’ चा ट्रेलर प्रेक्षकांना चित्रपटाच्या अनोख्या विश्वात घेऊन जातो. त्यातील व्यक्तिरेखा आणि कथेची पार्श्वभूमी यांची ओळख करून देत चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढवतो. जिमी शेरगिल यांचा नेहमीचा दमदार पडद्यावरील वावर आणि प्रनूतन बहलचा स्वतःचा खास अंदाज यामुळे सिनेमाच्या दोन वेगवेगळ्या पिढ्यांतील कलाकारांची ही जोडी विशेष लक्षवेधी ठरत आहे.
आपल्या प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांना प्रभावित करणारे जिमी शेरगिल यावेळीही एका वेगळ्याच अंदाजात दिसत आहेत. तर प्रनूतन बहलदेखील वेगवेगळ्या व्यक्तिरेखा आणि नव्या कथांमधून स्वतःला सतत एक्सप्लोर करताना दिसत आहे. त्यामुळे या दोघांची पडद्यावरची केमिस्ट्री पाहणं नक्कीच रंजक ठरणार आहे. लेखक-दिग्दर्शक शेखर एस. झा यांच्यासाठी हा चित्रपट त्यांची कल्पनाशक्ती आणि कथाकथनाची शैली मोठ्या पडद्यावर साकारण्याची एक खास संधी आहे. तर शायनिंग मून पिक्चर्सच्या बॅनरखाली या प्रकल्पाला पाठिंबा देणारे निर्माते रिंकू सिंहदेखील या सोहळ्यात उपस्थित होते. संपूर्ण टीमच्या मेहनतीचा आणि एकत्रित प्रयत्नांचा आनंद यावेळी साजरा करण्यात आला.
जिमी शेरगिल म्हणाले, “’प्यादे’ हा माझ्यासाठी एक रंजक प्रकल्प होता. या चित्रपटाचं वेगळं विश्व आणि मला साकारायला मिळालेली व्यक्तिरेखा यामुळे मी या सिनेमाकडे आकर्षित झालो. एक अभिनेता म्हणून मला नेहमी अशा कथा करायला आवडतात, ज्या मला काहीतरी नवीन शिकवतात आणि नव्याने शोध घेण्याची संधी देतात. या चित्रपटाने मला ती संधी दिली. शेखर आणि संपूर्ण टीमसोबत काम करण्याचा अनुभव खूप छान होता. आता ट्रेलर प्रेक्षकांसमोर आला आहे, त्यामुळे त्यांना हा चित्रपट किती भावतो आणि ते त्याच्याशी कसे जोडले जातात, हे पाहण्याची उत्सुकता आहे.”
प्रनूतन बहल म्हणाली, “’प्यादे’ चा भाग होणं हा माझ्यासाठी खरोखरच खूप खास अनुभव होता. प्रत्येक व्यक्तिरेखा आपल्याला काही ना काही शिकवते आणि या भूमिकेमुळे मला माझ्यातील एका वेगळ्या पैलूचा शोध घेता आला. जिमी सरांसोबत स्क्रीन शेअर करणं हा देखील खूप काही शिकवणारा अनुभव होता. आम्ही या चित्रपटासाठी मनापासून मेहनत घेतली आहे आणि आता प्रेक्षकांना आमच्या या मेहनतीची एक झलक पाहायला मिळणार आहे, याचा खूप आनंद आहे.”
लेखक-दिग्दर्शक शेखर एस. झा म्हणाले, “’प्यादे’ ही माझ्या मनाच्या खूप जवळची कथा आहे. एक चित्रपट निर्माता म्हणून आपण कागदावर जे स्वप्न रंगवतो, तेच जेव्हा प्रत्यक्ष पडद्यावर जिवंत होतं, तेव्हा मिळणारा आनंद काही औरच असतो. जिमी आणि प्रनूतन यांनी आपापल्या व्यक्तिरेखांमध्ये खूप खोली आणि प्रामाणिकपणा आणला आहे. माझ्या दृष्टिकोनावर विश्वास ठेवून या चित्रपटासाठी आपलं सर्वोत्तम देणाऱ्या संपूर्ण कलाकार आणि तंत्रज्ञांचे मी मनापासून आभार मानतो. हा ट्रेलर म्हणजे प्रेक्षकांसाठी आम्ही काय घेऊन येत आहोत, याची फक्त एक छोटीशी झलक आहे.”
निर्माते रिंकू सिंह म्हणाले, “’प्यादे’ला प्रत्यक्षात आणण्याचा हा प्रवास खूप पॅशन, मेहनत, समर्पण आणि टीमवर्कने भरलेला होता. सुरुवातीपासूनच आमचा या कथेवर विश्वास होता आणि तिला योग्य न्याय देण्यासाठी उत्तम कलाकारांची टीम एकत्र आणण्याची आमची इच्छा होती. जिमी शेरगिल सर आणि प्रनूतन बहल यांची साथ, त्यासोबत शेखर सरांची दृष्टी यामुळे हा प्रवास आणखी खास झाला. आता चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांसमोर आला आहे, याचा आनंद आहे. संपूर्ण टीमने ज्या प्रेमाने आणि आपुलकीने हा चित्रपट बनवला आहे, तेवढंच प्रेम प्रेक्षकांकडूनही मिळेल, अशी आशा आहे.”
‘प्यादे’चा ट्रेलर आता प्रेक्षकांच्या भेटीला!
