The Kerala Story : गेल्या काही दिवसांपासून द केरळ स्टोरी (The Kerala Story) हा सिनेमा जोरदार चर्चेत आहे. अनेकांनी या सिनेमावर टीका केली तर काही जण या सिनेमाचे मोठ्या प्रमाणात कौतुक करत आहेत. गेल्या काही दिवसापासून पत्रकारांशी संवाद साधताना अभिनेता कमल हसन (Kamal Haasan) यांनी ‘द केरळ स्टोरी’ हा प्रपोगंडा फिल्म असल्याचे यावेळी सांगितले आहे.
#WATCH | Abu Dhabi | "I told you, it's propagandist films that I am against. It's not enough if you write 'true story' just at the bottom as a logo. It has to really be true and that is not true," says actor and politician Kamal Haasan on #TheKeralaStory pic.twitter.com/VSydksg1Z3
— ANI (@ANI) May 27, 2023
आता कमल हसन यांच्या या वक्तव्यावर ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन (Sudipto Sen) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुदीप्तो सेन म्हणाले की, मी अशा विधानांवर प्रतिक्रिया देत नाही, अगोदर मी लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असायचो, पण आज मी तसे करत नाही. कारण ज्या लोकांनी या सिनेमाला प्रपोगंडा फिल्म म्हटले आहे, ते सिनेमा बघितल्यानंतर चांगली प्रतिक्रिया देत आहेत.
ज्यांनी सिनेमा बघितला नाही ते त्यावर टीका करत आहेत. अशा प्रकारे पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये देखील जोरदार टीका झाली. या लोकांनी सिनेमा बघितला नाही, म्हणून त्यांना तसा प्रचार आहे असे वाटते. तसेच कमल हसन म्हणाले होते की, “मी प्रपोगंडा सिनेमाच्या विरोधामध्ये आहे. सिनेमाच्या पोस्टर खाली ‘सत्य कथा’ अशी टॅगलाइन लावल्याने काही होत नाही. तो सिनेमा खरंच ‘सत्य कथेवर आधारित’ असावा. पण त्यामध्ये काही खरं नाही, कमल हसन यांच्या या वक्तव्याने अनेकांचे लक्ष वेधले आहे.
बऱ्याच लोकांनी या सिनेमाची मोठी प्रशंसा केली, तर काही बॉलिवूड कलाकारांनी यावार भाष्य देखील केले नाही. बॉलिवूडच्या एकंदरच या स्वभावावर नुकतंच दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी मोठं भाष्य केले आहे. याबद्दल ट्वीट करत त्यांनी म्हणाले आहे की आपण एखादी खोटी गोष्ट लोकांना आणि स्वतःला सांगण्यात इतके सराईत झालो असतो की, जेव्हा त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन कुणी आपल्याला सत्य सांगतं तेव्हा मात्र आपल्याला धक्काच बसतो.
राघव-परिणीती ‘या’ ठिकाणी अडकणार विवाह बंधनात; जोडपे वेंडिंग डेस्टिनेशल फायनल करण्यासाठी निघाले
‘द केरळ स्टोरी’ या सिनेमामध्ये अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बलानी आणि सिद्धी इडनानी या अभिनेत्रींनी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या सिनेमातील अदाच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करत आहेत. अदानं या सिनेमात शालिनी ही भूमिका साकरली आहे. शालिनी ही फातिमा कशी होते? हे द केरळ स्टोरी या सिनेमात दाखवण्यात आले आहे. द केरळ स्टोरी या सिनेमाला विरोध काही राज्यांमध्ये करण्यात आला आहे, तर काही राज्यांमध्ये हा सिनेमा टॅक्स फ्री करण्यात आला आहे. अनेक लोक या सिनेमाला ‘प्रपोगंडा फिल्म’ असल्याची टीका केली आहेत.