Download App

समाजवादीची टोपी कोंबड्याचा तुरा अन् ही बाई भांडखोर कोंबडी पण अमिताभ यांची पत्नी म्हणून… जया बच्चनवर कंगनाचा निशाणा

Kangana Ranaut ने जया बच्चन यांच्या या व्हायरल व्हिडीओवरून आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Kangana Ranaut Criticize to Jaya Bachhan for shocking the young man at Delhi Constitution Club : सध्या सोशल मिडीयावर समाजवादी पक्षाच्या खासदार आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्या सेल्फी घ्यायला आलेल्या तरूणाला धक्का देत आहेत. त्यावरून अभिनेत्री खासदार कंगना रनौत हिने समाजवादीची टोपी कोंबड्याचा तुरा अन् ही बाई भांडखोर कोंबडी असं म्हणत जोरदार निशाणा साधला आहे.

पॉलिटेक्निक डिप्लोमा प्रवेशाला मुदतवाढ, 4 सप्टेंबरपर्यंत घेता येईल प्रवेश; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

काय म्हणाली कंगना रनौत

जया बच्चन यांच्या या व्हायरल व्हिडीओवरून कंगना रनौतने आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हा व्हिडीओ पोस्ट केला. त्यात तिने लिहिले आहे की, ही अत्यंत खराब बाई आहे. लोकं तिचा मुर्खपणा केवळ ती अभिताभ बच्चन यांची पत्नी आहे, म्हणून सहन करतात. ही समाजवादी पक्षाची टोपी कोंबड्याच्या तुऱ्या सारखी दिसते आणि ही बाई भांडखोर कोंबडी सारखी. हे लज्जास्पद आहे.

16 कोटींचा अलिशान सी फेसिंग व्ह्यू फ्लॅट वापराविना, पण मुंडेंना सोडवेना शासकीय निवासस्थान

नेमकं प्रकरण काय?

समाजवादी पक्षाच्या खासदार आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया या दिल्लीतील कॉन्स्टीट्युशनल क्लब येथे गेलेल्या होत्या. त्यावेळी पायऱ्यांवर एका तरूणाने जया यांच्याकडे सेल्फीची मागणी केली. त्यावेळी त्या त्याच्याशी उद्धटपणे वागल्या. त्यांनी त्याला धक्का दिला. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. त्यावर नेटकरी त्यांना प्रचंड ट्रोल केलं जात आहे. त्यात आता कंगनाने देखील जया यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

follow us