Download App

Kangana Ranaut: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या आरोपांवर अभिनेत्री भडकली; म्हणाली, ‘मी गोमांस …’

Kangana Ranaut On Vijay Wadettiwar: हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा (Lok Sabha) मतदारसंघातील भाजप उमेदवार आणि बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut ) सोमवारी (8 एप्रिल, 2024) काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्या दाव्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ती म्हणाली की, मी गोमांस किंवा कुठल्याही प्रकारचं मांस खात नाही. ही बाब खूप लज्जास्पद आहे की माझ्याविषयी अफवा पसरवल्या जात आहेत. मी गेल्या काही दशकांपासून योग आणि आयुर्वेदिक जीवनशैली अंगिकारली आहे.

माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी माझ्यावर अशा अनेक प्रकारचे गंभीर आरोप लावले जात आहेत. मात्र मला याने काही फरक पडणार नाही. माझी प्रतिमा कलंकित करण्यासाठी मी गोमांस खाते असा प्रचार केला जातो. मात्र मी हे सांगू इच्छिते की मी एक स्वाभिमानी हिंदू आहे. माझ्याबद्दल दिशाभूल करणारी वक्तव्यं करुन काहीही होणार नाही जय श्रीराम! अशी पोस्ट कंगनाने यावेळी केली आहे.


काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी गंभीर आरोप केले होते की, अभिनेत्री भाजपाची उमेदवार आहे आणि ती बीफ खाते. एवढंच नाही तर त्यांनी हा दावाही केला होता की कंगनाने स्वतः ही गोष्ट एक्स या सोशल मीडिया साईटवर पोस्ट करण्यात आली होती की ती बीफ म्हणजेच गोमांस खाते आणि तिला ते खूप आवडतं. यानंतर कंगनावर जोरदार टीका होऊ लागली होती. तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील केलं गेलं आहे. आता कंगनाने या सगळ्या आरोपांवर जोरदार हल्लाबोल केले आहे.

Jar Tar Chi Goshta: ‘जर तर ची गोष्ट’ची शंभरी; प्रिया बापटच्या आवाजातील नवं गाणं रिलीज

कंगना राणौतबद्दल दररोज आक्षेपार्ह कमेंट किंवा दावे केले जात आहेत. काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेट यांनी अलीकडेच त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर राणौत आणि त्यांचा मतदारसंघ मंडी यांना जोडणारी आक्षेपार्ह पोस्ट केली होती. मात्र, श्रीनेटने याबाबत सांगितले होते की, तिने हे पोस्ट केले नव्हते.

follow us

वेब स्टोरीज