Kangana Ranaut कडून कौतुक, जावेद अख्तर म्हणतात “ती पुन्हा जुन्या…”

“मी कंगनाला फार महत्त्व देत नाही. त्यामुळे तिने तिच्या वक्तव्यालाही महत्त्वाचं समजत नाही.” अशी प्रतिक्रिया कंगना रणौत यांच्या कौतुकावर जावेद अख्तर यांनी दिली आहे. काही दिवसापूर्वी जावेद अख्तर यांनी पाकिस्तानमध्ये एका कार्यक्रमात बोलताना पाकिस्तानवर टीका केली होती. दहशतवादाचा मुद्दा अधोरेकीत करत त्यांनी पाकिस्तानवर टीका केली होती. हेही वाचा : Live Blog | Thackeray Vs Shinde : […]

_LetsUpp (1)

javed akhtar & kangana ranaut

“मी कंगनाला फार महत्त्व देत नाही. त्यामुळे तिने तिच्या वक्तव्यालाही महत्त्वाचं समजत नाही.” अशी प्रतिक्रिया कंगना रणौत यांच्या कौतुकावर जावेद अख्तर यांनी दिली आहे. काही दिवसापूर्वी जावेद अख्तर यांनी पाकिस्तानमध्ये एका कार्यक्रमात बोलताना पाकिस्तानवर टीका केली होती. दहशतवादाचा मुद्दा अधोरेकीत करत त्यांनी पाकिस्तानवर टीका केली होती.

हेही वाचा : Live Blog | Thackeray Vs Shinde : तिसऱ्या दिवशीही कपिल सिब्बल यांचाच युक्तिवाद

कंगना रणौत यांनी काय म्हटलं होत?

कंगना रणौतने जावेद अख्तर यांचा या कार्यक्रमातील व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला होता. कॅप्शन मध्ये म्हटले होते की, “जेव्हा मी जावेद साहेबांच्या कविता ऐकते तेव्हा असं वाटतं की कशी सरस्वती मातेने यांच्यावर एवढी कृपा केली आहे. पण पाहा काहीतरी प्रामाणिकपणा असतोच माणसात. जय हिंद जावेद अख्तर साहेब. घरात घुसून मारलात. हाहाहा” असं म्हटलं होतं.

कंगनाच्या कौतुकावर जावेद अख्तर म्हणतात…

“मी कंगनाला फार महत्त्व देत नाही. त्यामुळे तिने तिच्या वक्तव्यालाही महत्त्वाचं समजत नाही.” अशी प्रतिक्रिया कंगनाच्या कौतुकावर जावेद अख्तर यांनी दिली आहे. एका टीव्ही वाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, “कंगनाच्या कौतुकाने मला काही फरक पडत नाही. काही दिवसांत ती पुन्हा जुन्या झोनमध्ये परत येईल. काळजी करू नका हे काही काळासाठीच आहे. खरं तर मी कंगनाला फार महत्त्व देत नाही. त्यामुळे तिने तिच्या वक्तव्यालाही महत्त्वाचं समजत नाही.”

Exit mobile version