Live Blog | Thackeray Vs Shinde : पुढील सुनावणी 28 फेब्रुवारीला, आज कोर्टात काय घडलं?

  • Written By: Published:
Live Blog | Thackeray Vs Shinde : पुढील सुनावणी 28 फेब्रुवारीला, आज कोर्टात काय घडलं?

शिवसेना कोणाची? आणि राज्यातील संपूर्ण सत्तासंघर्षांवर सर्वोच्च न्यायालयात आज सलग तिसऱ्या दिवशी नियमीत सुनावणी होत आहे. ठाकरे गटाकडून काल कपिल सिब्बल यांनी आपली बाजू मांडली आहे. आज शिंदे गटाकडून युक्तिवाद केला जाणार आहे.

दरम्यान निवडणूक आयोगाने ‘शिवसेना‘ हे पक्षाचं नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्याच्या निर्णयाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होत. त्यावरही काल सुप्रीम कोर्टाने सुनावणी घेतली.

सुप्रीम कोर्टातील युक्तिवाद आणि न्यायालयाचा निर्णय याचे संपूर्ण अपडेट वाचा.

The liveblog has ended.

LIVE NEWS & UPDATES

  • 23 Feb 2023 04:21 PM (IST)

    पुढील सुनावणी 28 फेब्रुवारी रोजी

    राज्याच्या सत्तासंघर्षात सलग तीन दिवस युक्तिवाद झाला. मात्र, अद्यापही फक्त ठाकरे गटाचाच युक्तिवाद सुरू आहे. त्यामुळे उर्वरित सुनावणी ही 28 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे.

    पुढील सुनावणी वेळी ठाकरे गट आपला युक्तिवाद पूर्ण करेल आणि त्यानंतर मुख्यमंत्री शिंदें यांच्या गटाची बाजू मांडण्यात येईल.

  • 23 Feb 2023 04:20 PM (IST)

    विश्वासदर्शक ठरावाला सामोरे गेला असता, तर...

    अभिषेक मनू सिंघवी यांनी न्यायालयात युक्तिवाद सुरु केल्यानंतर त्यांनी २९ आणि ३० जून रोजी घडलेला घटनाक्रम वाचून दाखवला. २९ जून रोजी सर्वोच्च न्यायालयाने विश्वासदर्शक ठराव सभागृहात मांडण्याला परवानगी दिली. त्यानंतर त्याच दिवशी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

    सिंघवी यांचं याच मुद्दयांवर न्यायालायने एक महत्व पूर्ण निरीक्षण सांगितलं. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याच्या मुद्द्यावरून न्यायालयानं ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांना सुनावलं.

     

    न्यायालयाने सांगितलं की “जर तुम्ही विश्वासदर्शक ठरावाला सामोरे गेला असता, ज्यात खुल्या पद्धतीने मतदान होतं, आणि हरला असता तर त्या ३९ आमदारांमुळे नेमका काय परिणाम झाला ते स्पष्ट होऊ शकलं असतं. जर फक्त त्या ३९ आमदारांमुळे तुम्ही विश्वासदर्शक ठराव हरला असता, तर ते अपात्र ठरल्यानंतर तुम्ही तो ठराव जिंकला असता.”

  • 23 Feb 2023 01:28 PM (IST)

    बहुमत चाचणीवरही स्टे द्यायला हवा का ?

    अपात्रतेवर स्थगिती दिली, तर बहुमत चाचणीवरही स्टे द्यायला हवा का ?

    सरन्यायाधीशांचा सिंघवींना महत्त्वपूर्ण सवाल

  • 23 Feb 2023 01:28 PM (IST)

    ...तर सत्ताबदल झाला नसता- सिंघवीचा युक्तिवाद

    कोर्टाच्या या सगळ्यांत दहाव्या परिशिष्टाचा हेतूच विसरून जातोय. सभागृहातील घटनांशी राज्यपालांचा संबंध नसतो पण राज्यपालांचे राजकीय लागेबांधे असतातच.

    २७ आणि २९ जूनच्या आदेशावरच शिंदे सरकार आलं. २७ जूनला कोर्टानं अध्यक्षांनी अपात्रतेची कारवाई करण्यापासून रोखलं. २९ तारखेला कोर्टानं बहुमत चाचणीस परवानगी दिली. हे दोन आदेशच अस्तित्वात नसते, तर सत्ताबदल झाला नसता.

    बहुमत चाचणीवर बाह्य गोष्टींचा प्रभाव पडू नये. कोणाच्याही हस्तक्षेपाशिवाय बहुमत चाचणी व्हावी. उपाध्यक्षांना त्यांचा निर्णय घेऊ द्या.

    ठाकरे गटाचे वकील सिंघवींचा युक्तिवाद

  • 23 Feb 2023 01:18 PM (IST)

    कपिल सिब्बल यांच कौतुक करत आव्हाड म्हणतात..

    कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद पाहून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

    आव्हाड यांनी एक ट्विट करत म्हटलं आहे की, “आज जेव्हा कपिल सिब्बल हे मा. न्यायालयामध्ये एका राजकीय पक्षाची भूमिका मांडत होते; तेव्हा असे वाटत होते की, भारतीय संघराज्यामधील संसदीय लोकशाही जिवंत रहावी यासाठी ते तळमळीने बाजू लावून धरत होते. त्यांचे डोळे पाणावल्यासारखे दिसत होते.”

    सविस्तर बातमी वाचा

  • 23 Feb 2023 01:16 PM (IST)

    अभिषेक मनू सिंघवी कोर्टात युक्तिवाद सुरु

    कपिल सिब्बल यांच्यानंतर ठाकरे गटाचे दुसरे वकील अभिषेक मनू सिंघवी कोर्टात युक्तिवाद करत आहेत. सिंघवी यांच्यानंतर ठाकरे गटाचे तिसरे वकील देवदत्त कामत युक्तिवाद करतील.

    त्यानंतर शिंदे गटाचे वकील युक्तिवाद करतील.

  • 23 Feb 2023 12:33 PM (IST)

    मी ही केस जिंकेन किंवा हरेन. त्यासाठी... कपिल सिब्बल यांचा भावनिक शेवट

    अडीच दिवस युक्तिवाद केल्यानंतर कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद संपवला आहे. आपला युक्तिवाद संपवताना त्यांनी एक भावनिक वाक्य बोलत संपवला.

    ते म्हणाले की, “मी ही केस जिंकेन किंवा हरेन..त्यासाठी मी इथे उभा नाही. मी इथे आपल्या सगळ्यांच्या हृदयाच्या जवळ असणाऱ्या एका गोष्टीसाठी उभा आहे. संस्थात्मक सार्वभौमत्व आणि राज्यघटनेची जपणूक करण्यासाठी मी इथे उभा आहे. जर न्यायालयानं हा सगळा प्रकार वैध ठरवला, तर आपण १९५० सालापासून जी गोष्ट इतकी काळजीपूर्वक जपून ठेवली आहे, तिचा मृत्यू होईल”

  • 23 Feb 2023 12:26 PM (IST)

    मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत निकाल लागेल

    सुनावणीच्या तिसऱ्या दिवशीही ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल हेच युक्तिवाद करत आहेत. सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामत युक्तिवाद करतील. पुढच्या आठवड्यात शिंदे गटाचा युक्तिवाद होईल.

    पुढच्या आठवड्यात शिंदे गटाच्या वकिलांनी युक्तिवाद लवकर संपवला तर त्यानंतर निर्णय होईल. त्यामुळे मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत निकाल लागेल असं वाटतं, असं मत ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी व्यक्त केलं आहे.

  • 23 Feb 2023 11:43 AM (IST)

    एकनाथ शिंदे शिवसेना आहेत हे राज्यपालांनी कसं ठरवलं ?

    असं इतिहासांत पहिल्यांदाच झालंय की राज्यपालांनी शिवसेना पक्ष म्हणून दुस-याचं व्यक्तीला सत्ता स्थापनेची संधी दिली.

    वास्तविक उद्धव ठाकरे हे जानेवारी २०२३ पर्यंत पक्ष प्रमुख होते. पण राज्यपालांनी एकनाथ शिंदेना सत्ता स्थापन करण्यास सांगितले. एकनाथ शिंदे आणि त्यांचे 39 आमदार शिवसेना आहेत हे राज्यपालांनी कसं ठरवलं ?

    सरकार उलथवण्याचा राज्यपालांना अधिकार नाही.

    ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद

  • 23 Feb 2023 11:11 AM (IST)

    तिसऱ्या दिवशीही ठाकरे गटच बाजू मांडणार

    सुप्रीम कोर्टातील सुनावणीच्या तिसऱ्या दिवशीही ठाकरे गटच बाजू मांडणार आहे.

    ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल हेच बाजू मांडत आहे

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube