“संसदीय लोकशाही जिवंत रहावी यासाठी ते तळमळीने…” कपिल सिब्बल यांच कौतुक करत आव्हाड म्हणतात..

  • Written By: Published:
“संसदीय लोकशाही जिवंत रहावी यासाठी ते तळमळीने…” कपिल सिब्बल यांच कौतुक करत आव्हाड म्हणतात..

गेल्या दोन दिवसांपासून ठाकरे आणि शिंदे यांच्या वादासोबत राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. गेले दोन दिवस ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल बाजू मांडत होते. ठाकरे यांची बाजू मांडताना सिब्बल यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले सोबतच अनेक प्रश्न देखील उपस्थित केले.

कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद पाहून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचे कौतुक केले आहे. आव्हाड यांनी एक ट्विट करत म्हटलं आहे की, “आज जेव्हा कपिल सिब्बल हे मा. न्यायालयामध्ये एका राजकीय पक्षाची भूमिका मांडत होते; तेव्हा असे वाटत होते की, भारतीय संघराज्यामधील संसदीय लोकशाही जिवंत रहावी यासाठी ते तळमळीने बाजू लावून धरत होते. त्यांचे डोळे पाणावल्यासारखे दिसत होते.”

दरम्यान सलग अडीच दिवस युक्तिवाद केल्यानंतर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद संपवला आहे. आपला युक्तिवाद संपवताना त्यांनी एक भावनिक वाक्य बोलत संपवला.

ते म्हणाले की, “मी ही केस जिंकेन किंवा हरेन..त्यासाठी मी इथे उभा नाही. मी इथे आपल्या सगळ्यांच्या हृदयाच्या जवळ असणाऱ्या एका गोष्टीसाठी उभा आहे. संस्थात्मक सार्वभौमत्व आणि राज्यघटनेची जपणूक करण्यासाठी मी इथे उभा आहे. जर न्यायालयानं हा सगळा प्रकार वैध ठरवला, तर आपण १९५० सालापासून जी गोष्ट इतकी काळजीपूर्वक जपून ठेवली आहे, तिचा मृत्यू होईल”

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube