Chandramukhi 2 : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतला (Kangana Ranaut) ही बोल्ड क्वीनआहे. ती नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. कंगना आपल्या विधानाप्रमांनेच तिच्या चित्रपटांसाठीही प्रसिध्द आहे. ती आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करते. कंगना सध्या तिच्या चंद्रमुखी २ (Chandramukhi 2) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. (Kanganas Chandramukhi 2 first look release Film release 19 september)
काही काळापूर्वी या चित्रपटातून अभिनेता राघव लॉरेन्सचा फर्स्ट लूक समोर आला होता. तेव्हापासून चाहते कंगनाच्या फर्स्ट लूकची वाट पाहत होते. आता चाहत्यांची प्रतीक्षा संपली असून निर्मात्यांनी चंद्रमुखी 2 मधून कंगनाचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे, ज्यामध्ये ती राणीच्या भूमिकेत खूप सुंदर दिसत आहे. कंगनाला या लूकमध्ये पाहून चाहते फिदा झाले आहेत. यासोबतच निर्मात्यांनी चित्रपटाची रिलीज डेटही शेअर केली आहे. सप्टेंबर महिन्यात 19 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
कंगनाने तिच्या इंस्टाग्रामवर ‘चंद्रमुखी 2’ चा फर्स्ट लूक शेअर केला आणि त्याला ‘सौदर्यंवती… आणि तिच्या अदा.. लक्ष वेधून घेणारी चंद्रमुखी. शाही थाटात सादर करत आहे चंद्रमुखी २’, असं कॅप्शन दिलं. कंगनाचा हा लूक प्रेक्षकांना खूप आवडला आहे. या फोटोंमध्ये कंगना कुरळे केस आणि धारदार अदांनी चाहत्यांना आश्चर्यचकीत करतांना दिसते. यावेळी तिने हिरव्या रंगाचा लेहेंगा चोली घातली आहे. यासोबतच कंगनाने गळ्यात जड नेकलेस आणि कमरेला बेल्ट घातलेला दिसतोय. कंगनाची या फोटोतील पोज देण्याची रॉयल स्टाइल पाहून या चित्रपटात तिची भूमिका खूपच दमदार असणार आहे, हे स्पष्ट होत आहे. यूजर्स या फोटोवर कमेंट करत खूप कौतुक करत आहेत कंगनाचा हा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
अंबादास दानवेंची खुर्ची धोक्यात; विधानपरिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदावरही काँग्रेसचा दावा
‘चंद्रमुखी 2’ चित्रपटाबद्दल बोलायचे तर हा चित्रपट 2005 मध्ये आलेल्या चंद्रमुखीच्या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा सिक्वेल आहे. चंद्रमुखीच्या पहिल्या भागात रजनीकांत, ज्योतिका यांच्या भूमिका होत्या. हा सिनेमा पी. वासू यांनी दिग्दर्शित केला होता.
तर ‘चंद्रमुखी 2’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनही त्यांनीच केले. या चित्रपटात कंगना राणौतसह वडिलेलू, सृष्टी डांगे आणि लक्ष्मी मेनन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
कंगना राणौतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच तिच्या ‘इमर्जन्सी’ आणि ‘तेजस’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.