Download App

Dhadak 2 : सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी यांचा ‘धडक 2’ कधी रिलीज होणार? चित्रपटाच्या रिलीजची घोषणा

Dhadak 2 Movie : धडक-2 मध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी हे लीड रोलमध्ये असणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन शाजिया इक्बाल करणार आहेत.

Dhadak 2 Release Date: ‘धडक’ हा (Dhadak ) चित्रपट 2018 साली प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आणि ईशान खट्टर (Ishaan Khattar) यांनी बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण केले होते. प्रत्येकाच्या हृदयाला भिडणारी प्रेमकथा या चित्रपटात दाखवण्यात आली. आता धर्मा प्रोडक्शनमध्ये ‘धडक 2’ हा चित्रपट येत आहे. ज्यामध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी (Tripti Dimri) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट एका अनोख्या प्रेमकथेवर आधारित असेल जो पुन्हा एकदा तुमच्या हृदयाला स्पर्श करेल. (Dhadak 2 Release Date) निर्मात्यांनी चित्रपटासंबंधीचे मोठे अपडेट्स शेअर केले आहेत.


‘धडक 2’ हा चित्रपट यावर्षी बॉक्स ऑफिसवर (box office) धडकणार आहे. या चित्रपटाची कथा कशी असेल याची एक छोटीशी झलक एका व्हिडीओमध्ये दाखवण्यात आली आहे, ज्याद्वारे तुम्हाला कथा काय आहे हे समजेलच पण चित्रपट पाहण्याची उत्सुकताही वाढणार आहे.

‘धडक 2’ ची रिलीज डेट जाहीर

धर्मा प्रोडक्शनने ‘धडक 2’ चित्रपटाचा छोटा टीझर शेअर केला आहे. ज्यामध्ये चित्रपटाची कथा कोणत्या मुद्द्यावर असेल हे दाखवण्यात आले होते. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, ‘धडक 2 सादर करत आहे, ज्यामध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती दिमरी मुख्य भूमिकेत असतील आणि चित्रपटाचे दिग्दर्शन शाझिया इक्बाल करणार आहेत. हा चित्रपट 22 नोव्हेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

शेअर केलेल्या व्हिडिओच्या सुरुवातीला एक भिंत दाखवली आहे आणि त्यावर काही वेगळ्या गोष्टी लिहिल्या आहेत. यासोबतच चित्रपटाच्या प्रॉडक्शन हाऊसची नावेही लिहिली आहेत. मग ‘एक होता राजा, एक होती राणी, जाती वेगळ्या, कथेचा शेवट.’ यानंतर सिद्धांत आणि तृप्ती यांचे चेहरे दाखवले आहेत. पार्श्वभूमीतून आवाज येतो, ‘तुम्ही जे स्वप्न पाहत आहात, विधी, त्याला वास्तवात स्थान नाही.’ तेवढ्यात एका मुलीचा आवाज येतो आणि ती म्हणते, ‘मग मला हे पण सांग निलेश… या भावनांचं मी काय करू…

Milind Gawali: लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्याची बायकोसाठी खास पोस्ट; म्हणाला, ‘एका डोंबाऱ्या…’

‘धडक 2’ ही एक प्रेमकथा असू शकते. यामध्ये दोन प्रेमी वेगवेगळ्या जातीतील असल्यामुळे भेटू शकत नाहीत. किंवा ते भेटले तरी त्यांची अवस्था ‘धडक’ (2018) मधील मधुकर आणि पार्थवीसारखी होते. 22 नोव्हेंबर 2024 रोजी हा चित्रपट कसा असेल हे तुम्हाला समजणार आहे. सध्या ही एक प्रेमकथा असेल जी करण जोहर निर्मित करणार आहे.

follow us

वेब स्टोरीज