Milind Gawali: लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्याची बायकोसाठी खास पोस्ट; म्हणाला, ‘एका डोंबाऱ्या…’

Milind Gawali: लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्याची बायकोसाठी खास पोस्ट; म्हणाला, ‘एका डोंबाऱ्या…’

Milind Gawali Post: ‘आई कुठे काय करते’ (aai kuthe kay karte) सिरीयलच्या माध्यमातून घराघरात लोकप्रिय असलेला अभिनेता म्हणजे मिलिंद गवळी (Milind Gawali ). उत्तम अभिनयासह ते त्यांच्या लिखाणामुळे कायम चर्चेत असतात. सोशल मीडियावर (Social Media) सतत सक्रीय असलेले मिलिंद गवळी कायम सोशल मीडियावर नवनवीन पोस्ट शेअर करत असताना पाहायला मिळतात. (Marathi serial) या पोस्टमध्ये यावेळी त्यांनी 34व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त (Wedding Anniversary) बायकोला खास शुभेच्छा दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Gawali (@milindgawali)


मिलिंद गवळी यांनी बायको दिपासोबतच्या खास फोटोंचो व्हिडीओ पोस्ट केला आहे. यावर कॅप्शन देत त्यांनी लिहलं आहे की, “एका डोंबाऱ्या बरोबर 34 वर्ष संसार सुरू आहे” आज आमच्या लग्नाला 34 वर्ष पूर्ण झाली, माझ्या बहिणीने शेगावच्या गजानन महाराजांकडे नवस बोलला होता, माझा भाऊ मिलू जर दहावी पास झाला तर मी त्याला शेगावला दर्शनाला घेऊन येईन आणि कदाचित शेगावच्या गजानन महाराजांमुळे मी दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत 47 टक्के मार्काने उत्तीर्ण झालो, अकरावीला गेलो.

आई म्हणाली की जळगावला देशमुखांच्या घरचं लग्न आहे, ते लग्न attend करून, आपण मिलू चा नवस फेडायला शेगावला जाऊया, मी म्हणालो मला नाही यायचं जळगाव बीळगावला, आई म्हणाली नवस आहे तो तर फेडावाच लागतो, पहाटे आमची एसटी जळगावला पोहोचली, लग्न घरी पोहोचलो आणि समोर एक अतिशय सुंदर मुलगी मला दिसली, आईला म्हटलं की ती लांब केसांची लाल ड्रेस मधली जी मुलगी आहे, तिच्याशी मला लग्न करायचं, आयुष्यभर आईने माझे हट्ट पुरवले, तसाच हा सुद्धा हट्ट तिने पुरवला. आईने लगेच तिच्या घरच्यांना सांगितलं मला ही मुलगी सून म्हणून पसंत आहे. मुलांचं लग्नाचं वय झालं की आपण या दोघांच्या लग्नाचा विचार करूया.

माझे आई वडील दोघेही अतीशय प्रेमळ, आणि हे सगळ्यांना माहीत होतं, त्यामुळे त्यांना खात्री होती आपली दिपूली त्या घरात सुखात राहील, आणि मुलगा मोठा झाल्यावर काय ना काहीतरी काम धंदा करेलच, पण त्यांना कुठे कल्पना होती, की मुलगा भविष्यात डोंबाऱ्याचा खेळ करत करत गावगाव भटकत राहणार आहे,
26 मे 1990 साली आमचं लग्न झालं.

आज त्याला 34 वर्ष पूर्ण झाली, त्या वेळेला बिचारी दिपा तिला कल्पनाही नसेल एका कलाकाराबरोबर संसार करायचा म्हणजे किती खडतर प्रवास असणार आहे, अगदी डोंबाऱ्याचा खेळ करणाऱ्यां सारखाच, मी मराठी सिनेमांमध्ये काम करत करत सातारा कोल्हापूर सांगली अमरावती यवतमाळ नागपूर भंडारा गडचिरोली बेळगाव पुणे नाशिक बीड लातूर संभाजीनगर जळगाव या ठिकाणी shooting करत होतो, आपला नवरा सतत फिरत राहणार आहे याची त्या बिचारीला कल्पनाच नव्हती, आजही गेली साडेचार वर्ष घरदार सोडून ठाण्यामध्ये राहते आहे, कुठल्याही परिस्थितीत adjust करत असते.

Bhumi Pednekar: पर्यावरण जागृतीसाठी अभिनेत्रीने सुरू केली, ‘भूमी नमस्कार’ मोहिम

एका कलाकाराबरोबर आयुष्य काढणं म्हणजे काय साधी सरळ गोष्ट आहे का? दिपाला stability, security नसताना , सतत हसत खेळत प्रसन्न राहून मला साथ देत राहिली. मी पण हा प्रवास तिच्या साथीने तिच्यासोबत करत आलो आहे, तिची साथ सोबत नसती तर इतक्या लांबचा पल्ला गाठूच शकलो नसतो, 34 वर्षाचा एकत्र प्रवास साधा सरळ सोपा तिच्यासाठी नव्हता, मला भक्कम साथ दिल्याबद्दल मी तुझा ऋणी आहे, आणि 34 साव्या आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिपा तुला खूप खूप शुभेच्छा.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज