Milind Gawali: ‘जन्मवेळेचा घोळ…’ मिलिंद गवळींच्या ‘त्या’ पोस्टनं वेधलं लक्ष

Milind Gawali: ‘जन्मवेळेचा घोळ…’ मिलिंद गवळींच्या ‘त्या’ पोस्टनं वेधलं लक्ष

Milind Gawali: अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) हे आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या सिरीयलमध्ये अनिरुद्ध ही भूमिका साकारत असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या या अभिनयाला चाहत्यांची मोठी पसंती मिळत आहे. मिलिंद हे सतत अनेक विषयांवर आधारित पोस्ट देखील सोशल मीडियावर (Social media) शेअर करत असतात. त्यांच्या एका पोस्ट चाहत्यांचे लक्ष वेधत असतात.

मिलिंद गवळी यांनी नुकतीच त्यांची पत्नी दिपा यांच्या वाढदिवसानिमित्त (birthday) एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या त्या पोस्टने अनेकांचे लक्ष वेधले आहे. मिलिंद यांनी दिपा यांचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत दिपा यांचे काही फोटो दिसून येत आहे. या व्हिडीओला मिलिंद यांनी कॅप्शन दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Gawali (@milindgawali)


‘दिपा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, तुला सुख, समृद्धी, आरोग्य, यश मिळो. सदैव आनंदी रहा, खुश रहा, नेहमी सारखं सतत हसत रहा, अशी ईश्वरचरणी प्रार्थना, आम्हाला अशीच inspire करत रहा.अशीच रहा आणि नशीबवान आहेस तू, तुला दोन वाढदिवस साजरे करायला मिळत आहेत, वर्षानुवर्ष वाढदिवस नऊ मे या तारखेला साजरा केला जातो, खरं तिचा जन्म १० मे चा आहे. पण मग का तिचा वाढदिवस एक दिवस अगोदर ९ ला साजरा केला जातो.

कारण तिच्या मोठ्या बहिणीचा म्हणजे रंजूताईचा वाढदिवस ९ मे ला असतो, मग मोठ्या बहिणीबरोबर या शेंडेफळाचा म्हणजेच दिपाचा पण वाढदिवस त्याच दिवशी साजरा व्हायचा, आणि वर्षां वर्ष हे असंच घडत होतं आणि मग ती स्वतः विसरून गेली होती, की तिचा जन्म १० मे चा आहे.म्हणून यावर्षी मी मुद्दामून तिच्या जन्मदिवशी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो….पुढे मिलिंद यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘खूप अश्या लोकांच्या जन्म तारखेचा घोळ असतो आणि अगोदरच्या पिढीचा तर खूप घोळ होता.

Ketaki Chitale: केतकी चितळे पुन्हा चर्चेत, ‘या’ गोष्टीवर आणली बंधनं ?

शाळेत अॅडमिशनकरिता वय पूर्ण नसतं, म्हणून तारीख बदलायची अगोदर एक पद्धत होती, मुलाचं वय जास्त आहे असं दाखवलं जायचं, पण नंतर घोळ असा व्हायचा की नोकरीमध्ये ते कमी वय असून सुद्धा ते लवकर रिटायर व्हायचे. बऱ्याच लोकांचा जन्म तारखे बद्दल, जन्म वेळेचा सुद्धा खूप मोठा घोळ झाला आहे. चुकीची जन्मवेळ दिल्याने जन्म पत्रिकेमध्ये भलतंच भविष्य लिहीले जायचं आहे. आत्ताच्या पिढीचा तसा घोळ नसावा असं मला वाटतं.

आता Precise and exact time of birth दिला जात असावा. पण आता कोणी पत्रिका तयार करत असतील का? याचीच मला शंका वाटते. कधी कधी तारखेचे आणि वेळेचे घोळ चांगले ही असतात. डबल सेलिब्रेशन करायला मिळतं. तर दीपा तुला दोन- दोन वाढदिवसाच्या डबल शुभेच्छा….. ‘अशी पोस्ट त्यांनी यावेळी केली आहे. मिलिंद गवळी हे सतत सोशल मीडियावर सक्रिय राहतात. त्यांच्या या सोशल मीडियावरील पोस्टला चाहत्यांनी मोठी पसंती दिली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube