Tripti Dimri: इंटिमेट सीन्स पाहून आई-वडील नाराज, अभिनेत्रीने पहिल्यांदाच व्यक्त केली खंत

Tripti Dimri: इंटिमेट सीन्स पाहून आई-वडील नाराज, अभिनेत्रीने पहिल्यांदाच व्यक्त केली खंत

Tripti Dimri On Intimate Scene With Ranbir Kapoor: संदीप रेड्डी वंगा (Sandeep Reddy Vanga) दिग्दर्शित ‘ॲनिमल’ (Animal Movie) हा सिनेमा सुपरहिट ठरला आहे. या चित्रपटात रणबीर कपूर (Ranbir Kapoor), रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) आणि अनिल कपूर (Anil Kapoor) मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात तृप्ती डिमरी (Tripti Dimri) देखील दिसणार आहे. त्रिपाठीची भूमिका तितकी मोठी नव्हती पण या चित्रपटातून त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. ॲनिमलनंतर तृप्ती ही राष्ट्रीय क्रश बनली आहे. ती प्रत्येक निर्मात्याची पहिली पसंती बनली आहे. चित्रपटात तृप्ती आणि रणवीर सिंगचे इंटिमेट सीन होते. चाहत्यांना ही दृश्ये खूपच आवडली पण तिच्या कुटूंबाला यामुळे खूप त्रास सहन करावा लागल्याचे अभिनेत्रीने खंत व्यक्त केली.

तृप्तीने एका मुलाखतीत सांगितले आहे की, ‘ॲनिमल’मध्ये रणबीरसोबतचे तिचे इंटिमेट सीन पाहून तिचे कुटूंब नाराज झाले. त्यानंतर तिने आई-वडिलांशी बराच वेळ चर्चा केली. एवढेच नाही तर तो सिनेमा करायला का घेतला? असे सवाल देखील यावेळी अभिनेत्रीला करण्यात आले होते.

दिलेल्या मुलाखतीत तृप्ती म्हणाली- ‘मला चित्रपट करण्यामागचे कारण माहित आहे. संदीप सरांना स्पष्ट होते की ही भूमिका छोटी असणार आहे पण मला हे पात्र मनोरंजक वाटले. प्रेक्षक काय म्हणतील याचा विचार करूनच आपण निर्णय घेऊ लागलो, तर कलाकार आपल्या आवडीचं काम कधीच करू शकणार नाहीत. ज्या भूमिका मला कम्फर्ट झोनमधून बाहेर येण्यास मदत करतात, त्या भूमिका मी केले आहेत. लोक मला ऑफरच्या संदर्भात खूप सल्ले देतात आणि मी ते सर्व ऐकते. माझ्याकडून चुका होऊ शकतात पण मला तसे करण्याचीही परवानगी आहे.

Fighterची रिलीज डेट आली समोर, जाणून घ्या चित्रपट ओटीटी वर कधी रिलीज होणार?

पुढे रणबीर कपूरसोबतच्या इंटिमेट सीनवर तृप्ती म्हणाली – हे सीन पाहून माझ्या आई-वडिलांना खूप वाईट वाटले. हा सीन का आवश्यक आहे यावर आमची चांगलीच चर्चा झाली. आणि मी माझ्या कुटूंबाची समजूत घालू शकले. त्यावेळेस वडिलांनी तू असं करायला नको होतं.अशी प्रतिक्रिया दिली होती.

‘ॲनिमल’ सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटात वडील आणि मुलाचे नाते दाखवण्यात आले आहे आणि मुलगा वडिलांसाठी काहीही करण्यास तयार होतो. या चित्रपटात बॉबी देओलने खलनायकाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट हिंदी, तमिळ, मल्याळम, तेलगू आणि कन्नड भाषेत प्रदर्शित झाला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube